विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या दोघांना कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 10:29 PM2018-02-14T22:29:59+5:302018-02-14T22:32:11+5:30
सत्र न्यायालयाने विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या दोन आरोपींना प्रत्येकी एक वर्ष कारावास व ४०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायाधिश एस. टी. भालेराव यांनी बुधवारी हा निर्णय दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सत्र न्यायालयाने विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या दोन आरोपींना प्रत्येकी एक वर्ष कारावास व ४०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायाधिश एस. टी. भालेराव यांनी बुधवारी हा निर्णय दिला.
कैलाश यादव खांडे (३०) व स्वप्निल रामा नाईक (२६ ) अशी आरोपींची नावे आहेत. खांडे हा बहादुरा तर, नाईक ठोंबरा येथील रहिवासी आहे. ही घटना ५ एप्रिल २०१३ रोजी घडली होती. इयत्ता अकरावीतील विद्यार्थिनी परीक्षा देऊन घरी परतत होती. तिच्यासोबत मैत्रिणी होत्या. दरम्यान, आरोपींनी तिच्याशी अश्लील शब्दांत संवाद साधला व अश्लील हावभाव केले. त्याचवेळी परिसरातील नागरिकांनी आरोपींना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. सरकारतर्फे अॅड. मदन सेनाड यांनी बाजू मांडली.