नागपूरला मिळणार दोन अप्पर तहसीलदार

By admin | Published: May 15, 2016 02:52 AM2016-05-15T02:52:21+5:302016-05-15T02:52:21+5:30

नागपूरला लवकरच दोन अप्पर तहसीलदार मिळणार आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

Two additional tehsildars will be available in Nagpur | नागपूरला मिळणार दोन अप्पर तहसीलदार

नागपूरला मिळणार दोन अप्पर तहसीलदार

Next

शासनाकडे प्रस्ताव सादर : शहर व ग्रामीणसाठी प्रत्येकी एक
नागपूर : नागपूरला लवकरच दोन अप्पर तहसीलदार मिळणार आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. यापैकी एक ग्रामीणसाठी तर एक शहरासाठी कार्यरत राहतील. राज्य शासनातर्फे महानगरपालिका क्षेत्रासाठी आणि आदिवासी भागासाठी स्वतंत्र तहसीलदार नेमण्यासंदर्भात घोषणा करण्यात आली होती. त्याअंतर्गत संपूर्ण राज्यातच अप्पर तहसीलदारांची पदे निर्माण करण्यात येणार आहेत. नागपूरचा विचार केला असता नागपूर जिल्ह्यात दोन अतिरिक्त तहसीलदाराची आवश्यकता आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला लवकरच मान्यता मिळणार असून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात होणार आहे. दोन अप्पर तहसीलदारांपैकी एक ग्रामीण आणि एक शहरासाठी राहील. हे पद समानार्थी राहील. अतिरिक्त तहसीलदाराकडे महत्त्वाची जबाबदारी राहील.
देवलापार व पारडी सर्कलमध्ये राहणार कार्यालय
नागपूर ग्रामीणच्या अप्पर तहसीलदाराचे कार्यालय हे आदिवासी सर्कल असलेल्या रामटेक तालुक्यातील देवलापार येथे तर नागपूर शहरातील (महानगरपालिका क्षेत्रातील) पारडी सर्कमध्ये अप्पर तहसीलदाराचे कार्यालय राहील. शहरातील अप्पर तहसीलदाराकडे जवळपास एक तृतीयांश भाग राहील.(प्रतिनिधी)

Web Title: Two additional tehsildars will be available in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.