अभ्यासासाठी रागावल्यामुळे छिंदवाड्यातील दोन मुलांनी सोडले घर; नागपूर रेल्वे स्थानकावर घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 08:49 PM2018-01-08T20:49:07+5:302018-01-08T20:49:49+5:30
अभ्यासासाठी आई-वडिलांनी रागावल्यामुळे दोन मुले घरून पळून नागपुरात आली. नागपूर रेल्वेस्थानकावर आरपीएफ जवानांनी त्यांना ताब्यात घेऊन रेल्वे चाईल्ड लाईनकडे सोपविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अभ्यासासाठी आई-वडिलांनी रागावल्यामुळे दोन मुले घरून पळून नागपुरात आली. नागपूर रेल्वेस्थानकावर आरपीएफ जवानांनी त्यांना ताब्यात घेऊन रेल्वे चाईल्ड लाईनकडे सोपविले.
पांढुर्णा जि. छिंदवाडा येथील १३ आणि १४ वर्षांची दोन मुले सोमवारी दुपारी ३.३० वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक १ वर मुंबई एण्डकडील भागात संशयास्पद अवस्थेत फिरताना आढळलीत. ड्युटीवरील आरपीएफ जवान विवेक कनोजिया याने त्यांना आरपीएफ ठाण्यात आणले. तेथे त्यांची चौकशी केली असता त्यांनी आई वडिलांनी अभ्यासासाठी रागावल्यामुळे घरून पळून आल्याची माहिती दिली. उपनिरीक्षक कृष्णा नंद राय यांनी दोन्ही मुलांना रेल्वे चाईल्ड लाईनच्या स्वाधीन केले. रेल्वे चाईल्ड लाईनने या मुलांच्या आई वडिलांना दूरध्वनीवरून सूचना दिली आहे. मुलांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना चाईल्ड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात आले.