नवीन वर्षात जीएसटीशी जुळणार दोन कोटी व्यापारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 12:33 AM2019-01-03T00:33:42+5:302019-01-03T00:36:41+5:30

जीएसटीच्या सुलभीकरणामुळे नवीन वर्षांत जीएसटीशी दोन कोटी व्यापारी जुळणार असून त्यामुळे त्यांना करपालन करणे शक्य होणार आहे. हा बदल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे शक्य झाल्याचे मत कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे (कॅट) राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी व्यक्त केले आहे.

Two crore businessmen who join with GST in the new year | नवीन वर्षात जीएसटीशी जुळणार दोन कोटी व्यापारी

नवीन वर्षात जीएसटीशी जुळणार दोन कोटी व्यापारी

Next
ठळक मुद्दे जीएसटीच्या सुलभीकरणाचे : कॅटतर्फे स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जीएसटीच्या सुलभीकरणामुळे नवीन वर्षांत जीएसटीशी दोन कोटी व्यापारी जुळणार असून त्यामुळे त्यांना करपालन करणे शक्य होणार आहे. हा बदल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे शक्य झाल्याचे मत कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे (कॅट) राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी व्यक्त केले आहे.
जीएसटीमध्ये किमान मर्यादा २० लाखांवरून ७५ लाखांवर नेण्याची सूचना पंतप्रधानांनी केली आहे. त्यांच्या सूचनांचे कॅटने स्वागत करताना त्याचा देशातील छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. भरतीया म्हणाले, केंद्र सरकार जीएसटीवर स्वतंत्रपणे काम करीत असून त्यामुळे छोट्या व्यापाऱ्यांच्या समस्या सुटणार आहे. हे चांगले संकेत आहे. व्यापारी जीएसटीशी जुळण्यास तयार आहेत. पण कर प्रणाली आणखी सुलभ करण्याची गरज आहे. सरकारने व्यापाऱ्यांना संगणक तंत्रज्ञानाशी जोडण्यास प्रोत्साहन द्यावे. कारण जीएसटी पूर्णपणे संगणक आधारित कर प्रणाली आहे असून जास्तीत जास्त व्यापाऱ्यांना जोडण्यासाठी संगणकाशी जोडणे आवश्यक आहे. त्याकरिता सरकारने व्यापाऱ्यांना वित्तीय मदत करावी. शिवाय कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून द्यावे. देशातील सात कोटी छोटे व्यापारी असून त्यापैकी केवळ ३५ टक्के व्यापारी संगणकाशी जुळले आहेत.
नवीन वर्षात दोन कोटी व्यापाऱ्यांच्या माध्यमातून सरकारचा महसूल वाढणार आहे. त्याकरिता देशातील व्यापारी संघटनांच्या माध्यमातून सरकारने राष्ट्रीय मोहीम राबवावी. त्या अंतर्गत व्यापाऱ्यांना जीएसटीच्या मुख्य तरतुदी आणि करपालन संदर्भात शिक्षित करावे. कॅट या मुद्यावर सरकारला सहकार्य करण्यास तयार आहे. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातील व्यापारी जीएसटीमध्ये नोंदणीकृत होणार आहे.

Web Title: Two crore businessmen who join with GST in the new year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.