विदर्भात हवामान खात्याचा दोन दिवस ऑरेंज अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 08:50 PM2021-07-21T20:50:12+5:302021-07-21T20:50:40+5:30

Orange Alert in Vidarbha हवामान विभागाने २२ आणि २३ तारखेला ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. सोबतच पूर्व विदर्भातील एखाद्या ठिकाणी अतिपावसाचा इशारा दिला असून, सावधगिरी बाळगण्याची सूचना केली आहे.

Two day Orange Alert of Meteorological Department in Vidarbha | विदर्भात हवामान खात्याचा दोन दिवस ऑरेंज अलर्ट

विदर्भात हवामान खात्याचा दोन दिवस ऑरेंज अलर्ट

Next
ठळक मुद्देपूर्वेकडे धोक्याचा इशारा : वायव्य बंगालमधील चक्रीवादळामुळे विदर्भात मान्सून सक्रिय

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : हवामान विभागाने २२ आणि २३ तारखेला ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. सोबतच पूर्व विदर्भातील एखाद्या ठिकाणी अतिपावसाचा इशारा दिला असून, सावधगिरी बाळगण्याची सूचना केली आहे.

वायव्य बंगालच्या उपसागराच्या आणि आसपासच्या भागांत चक्रीवादळ सुरू झाले आहे. ३.१ किलोमीटर आणि ६.६ किलोमीटर दरम्यान समुद्रसपाटीपासून उंचीसह दक्षिण-पश्चिम दिशेने ते झुकत आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरात आणि खालच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. या वातावरणाचा प्रभाव पडल्याने पुढील ४८ तास विदर्भात २१ ते २३ जुलैदरम्यान मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे. यामुळे हवामान विभागाने पुढील पाच दिवस सावधगिरीचा इशारा दिला आहे.

नागपूरसह पूर्व विदर्भातील बहुतेक सर्वच जिल्ह्यांत पावसाने बुधवारी सकाळपासून रिमझिम हजेरी लावली. यामुळे पावसाची टक्केवारी वाढली असून पिकाला पोषक पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. नागपूर शहरासह जिल्ह्यात बुधवारी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. दिवसभर कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरूच होता. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच असा अपेक्षित पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. शेतीसाठी पोषक असलेल्या आणि जमिनीत मुरणाऱ्या या पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.

मागील २४ तासांत सकाळी आठ वाजेपर्यंत नागपुरात २.६ मि.मी. पावसाची नोंद झाली. गडचिरोलीमध्ये ६० मि.मी., तर चंद्रपुरात बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत २१.८ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद आहे. अकोल्यामध्ये ६.४, अमरावती ९.२, यवतमाळ १३, बुलढाणा २, तर गोंदिया आणि वर्धा येथे १.२ मि.मी. पाऊस पडला.

पूर्वेकडे अतिपावसाचा इशारा

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २२ आणि २३ तारखेला विदर्भात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. यासोबतच पूर्वेकडील एखाद्या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली असून, सावधगिरीचा इशारा दिला आहे. २२ जुलैला भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांत, तर २३ तारखेला अमरावती व अन्य जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट दर्शविला आहे.

Web Title: Two day Orange Alert of Meteorological Department in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.