दोन जिल्हा न्यायाधीशांची बदली

By Admin | Published: May 16, 2016 03:13 AM2016-05-16T03:13:48+5:302016-05-16T03:13:48+5:30

नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयात तीन वर्षे सेवा पूर्ण झाल्यामुळे न्यायाधीश पी. एस. तरारे व न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांची बदली करण्यात आली आहे.

Two District Judges Transfer | दोन जिल्हा न्यायाधीशांची बदली

दोन जिल्हा न्यायाधीशांची बदली

googlenewsNext

नियमित प्रक्रिया : न्या. तरारे मुंबई तर, न्या. सूर्यवंशी खामगावात
नागपूर : नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयात तीन वर्षे सेवा पूर्ण झाल्यामुळे न्यायाधीश पी. एस. तरारे व न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांची बदली करण्यात आली आहे. तरारे यांना मुंबईतील शहर दिवाणी न्यायालयात तर, सूर्यवंशी यांची बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव न्यायालयात नेमणूक करण्यात आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींनी जिल्हा व दिवाणी न्यायाधीशांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. ही नियमित प्रक्रिया आहे. जिल्हा न्यायाधीश व्ही. बी. कुलकर्णी, वाय. जी. खोब्रागडे, एन. टी. घोटेकर व एस. बी. गावंडे यांना नागपूर येथेच कायम ठेवण्यात आले आहे. नाशिक येथील न्या. पी. बी. नाईकवाड यांची नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयात तर, ठाणे येथील एस. के. देशपांडे यांची नागपूर औद्योगिक न्यायालयात बदली करण्यात आली आहे.
वरिष्ठ दिवाणी न्यायाधीशांमधून एम. ए. भोसले यांची औरंगाबाद तर, ए. व्ही. धुळधुळे यांची मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. ठाणे येथील आर. एस. सालगावकर व न्या. श्रीमती एस. जी. शेख यांना नागपुरात नेमणूक देण्यात आली आहे. तसेच, कनिष्ठ दिवाणी न्यायाधीशांमधून प्रेरणा दांडेकर यांची नांदगाव (नाशिक), व्ही. सी. गवई यांची पिंपळगाव (नाशिक), एस. डी. चक्कर यांची धुळे, व्ही. जी. कारमोरे (कळमेश्वर) यांची वैजापूर (औरंगाबाद), ए. वाय. बोरकर यांची पालम (परभणी), आर. यू. शेख (कामठी) यांची सांगली, महेंद्र पाटील यांची धाडगाव (नंदुरबार), एस. के. चौधरी (नरखेड) यांची पुणे, एस. आर. निकम (कुही) यांची संग्रामपूर (बुलडाणा), एस. एन. भावसार यांची धरणगाव (जळगाव), न्या. श्रीमती ए. ए. हरणे यांची अकोला, न्या. व्ही. पी. धुर्वे यांची यावल (जळगाव), ए. एम. गोंडाणे यांची पाचोरा (जळगाव), एस. ए. ठाकरे यांची दारव्हा (यवतमाळ) तर, एस. व्ही. थोडगे यांची पुणे येथे बदली करण्यात आली आहे. एम. डी. कांबळे यांना नागपुरात कायम ठेवण्यात आले आहे. या न्यायाधीशांना उन्हाळ्याच्या सुट्या संपण्यापूर्वी संबंधित न्यायालयात आपापल्या पदाची सूत्रे स्वीकारायची आहेत. जिल्हा न्यायालयांना ७ जूनपर्यंत उन्हाळ्याच्या सुट्या आहेत.(प्रतिनिधी)

Web Title: Two District Judges Transfer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.