दोन डॉक्टरांना पकडले

By admin | Published: August 6, 2016 02:41 AM2016-08-06T02:41:37+5:302016-08-06T02:41:37+5:30

वाहन परवानासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी अर्जदाराची तपासणी तर नाहीच, उलट कुणाचेही

Two doctors caught | दोन डॉक्टरांना पकडले

दोन डॉक्टरांना पकडले

Next

परिवहन आयुक्तांचे चौकशीचे आदेश : परिवहन मंत्र्यांचे बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र
सुमेध वाघमारे/विशाल महाकाळकर ल्ल नागपूर
वाहन परवानासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी अर्जदाराची तपासणी तर नाहीच, उलट कुणाचेही नाव व फोटो दिल्यास काही मिनिटातच वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जाते. हे प्रमाणपत्र नागपूरच्या शहर व ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) मुख्य द्वाराजवळील टपरीवर मिळते. रस्त्यावर धावणाऱ्या लाखो लोकांचा जीव हाती असणारा चालक सक्षम असल्याचा दाखला देण्याची ही पद्धत जीवघेणी ठरत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच खळबळ उडाली.
स्वत: परिवहन आयुक्तांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले. याला घेऊन शहर आरटीओ कार्यालयाने पोलिसांकडे तक्रार करताच शुक्रवारी दोन तथाकथित डॉक्टरांना पकडले.
वयाची चाळिशी गाठलेल्यांना किंवा आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढताना किंवा वाहन परवानाचे नूतनीकरण करताना चालक हा शारीरिकदृष्ट्या सुदृढ असावा, असा नियम आहे.
हे सिद्ध करण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक असते. अर्जदार चालक हा अपंग तर नाही ना, याची तपासणी करीत त्याच्या डोळ्यांची आणि कानाची तपासणी प्राधान्याने करावी लागते. मात्र आरटीओसमोरील या डॉक्टरांकडे आवश्यक कोणतेही साधन नाही. कान, डोळे तपासणीतील तज्ज्ञ ही तर फार दूरची गोष्ट आहे. यातही हे डॉक्टरच आहेत का, यावरही शंका आहे. याला घेऊनच गुरुवारी ‘लोकमत’ चमूने स्टिंग आॅपरेशन केले. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या नावाने ‘फॉर्म १-ए’ हा अर्ज भरून शहर आरटीओ कार्यालयाच्या परिसरात बसणाऱ्या दोन तथाकथित डॉक्टरांना व ग्रामीण आरटीओ कार्यालयातील एका दलालाला दिला. त्यांनी कुठलेही आढेवेढे न घेता पैसे घेत काही मिनिटात प्रमाणपत्र दिले.

Web Title: Two doctors caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.