Maharashtra Assembly Election 2019 : दक्षिण-पश्चिम व दक्षिणमध्ये लागणार दोन ईव्हीएम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 12:32 AM2019-10-08T00:32:11+5:302019-10-08T00:35:20+5:30
नागपूर दक्षिण-पश्चिम व नागपूर दक्षिण या दोन मतदार संघात दोन तर उर्वरित दहा मतदार संघात एकच ईव्हीएम लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणाचे चित्र स्पष्ट झाले असून कोणत्या मतदार संघात किती बॅलेट यूनिट (बीयू) व कंट्रोल यूनिट (सीयू) (ईव्हीएम मशीन) लागतील हे ही स्पष्ट झाले. यानुसार नागपूर दक्षिण-पश्चिम व नागपूर दक्षिण या दोन मतदार संघात दोन तर उर्वरित दहा मतदार संघात एकच ईव्हीएम लागणार आहे.
नागपुरातील १२ मतदार संघासाठी २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. याकरिता ४४१२ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे. या मतदार केंद्रावर आवश्यक सर्व सुविधा ठेवण्यात येणार आहे. निवडणुकीत एकूण १४६ उमेदवार रिंगणात आहे. यात सर्वाधिक २० उमेदवार दक्षिण-पश्चिम तर सर्वात कमी ८ उमेदवार सावनेर व पूर्व नागपूर मतदार संघात आहे. एक बीयूत १६ बटण असतात. यात १५ बटण उमेदवारांचे तर एक बटण नोटाचे असते. नागपूर दक्षिण-पश्चिम व नागपूर दक्षिण नागपूर मतदार संघात २० व १७ उमेदवार आहेत. यामुळे या दोन मतदार संघात दोन बीयू लागणार असून उर्वरित मतदार संघात एकच बीयू (ईव्हीएम) असेल.
मतदार संघ उमेदवारांची संख्या
काटोल - १०
सावनेर - ८
हिंगणा - १२
उमरेड -११
नागपूर दक्षिण-पश्चिम २०
नागपूर दक्षिण १७
नागपूर पूर्व ८
नागपूर मध्ये १३
नागपूर पश्चिम १२
नागपूर उत्तर १४
कामठी १२
रामटेक ९