रुळावर काम करत असलेल्या दोन महिला मजुरांचा रेल्वेखाली येऊन मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2022 07:37 PM2022-01-08T19:37:47+5:302022-01-08T19:38:20+5:30

Nagpur News रेल्वे रुळाचे काम करीत असलेल्या दाेन महिला मजुरांचा रेल्वेने कटून दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताची ही घटना नागपूर जिल्ह्यातील काटाेल पाेलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी (दि.७) सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली.

Two female laborers working on the tracks died after falling under a train |  रुळावर काम करत असलेल्या दोन महिला मजुरांचा रेल्वेखाली येऊन मृत्यू

 रुळावर काम करत असलेल्या दोन महिला मजुरांचा रेल्वेखाली येऊन मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देमेंढेपठार-लाखाेळी परिसरातील घटना


लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे रुळाचे काम करीत असलेल्या दाेन महिला मजुरांचा रेल्वेने कटून दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताची ही घटना काटाेल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील चेन्नई-नागपूर-दिल्ली रेल्वे मार्गावरील मेंढेपठार-लाखाेळी परिसरात शुक्रवारी (दि.७) सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली.

शाेभा शिवचरण नेहारे (५२, रा. खुटांबा, ता. काटाेल) व प्रभा प्रल्हाद गजभिये (५०, रा. वाघाेडा, ता. काटाेल), अशी मृत महिलांची नावे आहेत. चेन्नई-नागपूर-दिल्ली रेल्वे मार्गावरील मेंढेपठार-लाखाेळी परिसरात रेल्वेची तिसरी लाईन टाकण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. या कामाकरिता कंत्राटदाराने काटाेल तालुक्यातील विविध गावातील मजूर कामाला लावले आहेत. दरम्यान, शुक्रवारी रेल्वे रुळाची पेंटिंग व गिट्टी बाजूला करण्याचे काम सुरू असताना अचानक एक्स्प्रेस रेल्वे गाडी आल्याने महिला मजूर घाबरल्या आणि रेल्वेखाली आल्याने दाेघींचा कटून मृत्यू झाला. एक महिला मजूर वेळीच बाजूला झाल्याने ती बचावली.

घटनेची माहिती मिळताच काटाेल पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. काटाेल ग्रामीण रुग्णालयात शनिवारी मृतदेहांची उत्तरीय तपासणी केल्यानंतर दाेन्ही मृतदेह कुटुंबीयांच्या सुपूर्द करण्यात आले. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी नाेंद केली असून, तपास सुरू केला आहे.

Web Title: Two female laborers working on the tracks died after falling under a train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.