दोन ते चारच उमेदवार रिंगणात : मतदारांनाही टेन्शन नाही
By admin | Published: February 17, 2017 02:54 AM2017-02-17T02:54:57+5:302017-02-17T02:54:57+5:30
महापालिकेच्या निवडणुकीत सर्वच उमेदवार स्थानिक व परिचित असतात. रिंगणातील उमेदवारांची संख्या जास्त झाली की मतदारही गोंधळतो.
२८ जागांवर ‘स्ट्रेट फाईट’
कमलेश वानखेडे नागपूर
महापालिकेच्या निवडणुकीत सर्वच उमेदवार स्थानिक व परिचित असतात. रिंगणातील उमेदवारांची संख्या जास्त झाली की मतदारही गोंधळतो. नेमके कुणाला मत द्यावे यावरून तो मतदानापर्यंत गोंधळतो. मात्र, तब्बल २८ जागांवर मतदारांचे टेन्शन कमी झाले आहे. या जागांवर फक्त दोन ते चारच उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे योग्य उमेदवार निवडायला मतदारांनाही सोपे जाणार असले तरी उमेदवारांचा मात्र कस लागणार आहे.
निवडणूक रिंगणात एका जागेवर दोन उमेदवारांमध्ये स्ट्रेट फाईट होत आहे. सात जागांवर प्रत्येकी तिरंगी तर २० जागांवर प्रत्येकी चौरंगी लढत आहे. १५ जागांवर प्रत्येकी पाच उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक ३६ (ब) या एकमेव जागेवर दोनच उमेदवार रिंगणात आहेत. येथे काँग्रेसच्या नगरसेविका रेखा बाराहाते तर भाजपाच्या नगरेसविका पल्लवी शामकुळे यांच्यात थेट लढत होत आहे. दोन नगरसेविकांमध्ये होत असलेल्या या थेट लढतीची शहरात चर्चा आहे. दोन्ही नगरसेविका अनुभवी आहेत. त्यामुळे आता मतदार कुणाला पसंती देतात, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
प्रभाग ३७ (ब) व (क)मध्ये तिरंगी लढत आहे. ३७ ब मध्ये भाजपाच्या सोनाली कडू, काँग्रेसच्या राधिका नासरे व बसपाच्या धारणी पटले यांच्यात लढत होत आहे. तर ३७ क मध्ये भाजपाच्या नंदा जिचकार, काँग्रेसच्या प्रज्ञा पन्नासे, बसपाच्या ममता बोदेले यांच्यात सामना रंगणार आहे. ३५ ब मध्ये नंदा देशमुख (काँग्रेस), मनीषा पडोळे (बसपा) व जयश्री वाडीभस्मे (भाजपा), प्रभाग २७ (ब) मध्ये सीमा ढोक (काँग्रेस), कुसुमताई बावनकर (शिवसेना) व दिव्या धुरडे (भाजपा), प्रभाग १९ (क) मध्ये रेखाबाई गौर (राष्ट्रवादी काँग्रेस)
महिला राखीव
जागांवरच तिरंगी
एकूण सात जागांवर प्रत्येकी तीनच उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी तब्बल सहा महिलांसाठी राखीव आहेत. याचाच अर्थ सहा जागांवर तीन पेक्षा जास्त महिलांनी निवडणूक लढविण्यात रस घेतला नाही. राजकारणात महिला सक्षमीकरणावर भर दिला जात असताना तब्बल सहा जागांवर तीन पेक्षा जास्त महिला रिंगणातच राहू नये ही बाब चिंताजनक आहे.