गुंडाच्या चाकूहल्ल्यात दोन मित्र गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 00:10 IST2021-04-09T00:09:27+5:302021-04-09T00:10:30+5:30
knife attack by a gangster तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिमकी भागात राहणारा कुख्यात गुंड मन्या उर्फ मनोज हेडावू याने दोघांवर चाकूहल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले.

गुंडाच्या चाकूहल्ल्यात दोन मित्र गंभीर जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिमकी भागात राहणारा कुख्यात गुंड मन्या उर्फ मनोज हेडावू याने दोघांवर चाकूहल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. गणेश अशोक बागडे (वय २४) आणि त्याचा मित्र सागर अशी जखमींची नावे आहेत.
आरोपी मन्यासोबत काही दिवसांपूर्वी बागडेचा वाद झाला होता. बुधवारी रात्री ८ च्या सुमारास बागडे आणि त्याचा मित्र सागर पिवळी शाळेच्या बाजूला पान टपरीवर उभे होते. तेथे आरोपी मन्या आला आणि बागडेला शिवीगाळ करू लागला. बागडेने समजावण्याचा प्रयत्न केला असता मन्याने चाकू काढून बागडेच्या पोटावर, कंबरेवर आणि पाठीवर घाव घातले. ते पाहून सागर त्याला समजावत असताना आरोपीने सागरलाही चाकू मारून जखमी केले. त्यामुळे हे दोघेही जखमी झाले. हा थरार पाहून आजूबाजूची मंडळी धावल्यामुळे बागडे आणि सागरचा जीव वाचला. मिळालेल्या माहितीवरून, तहसील पोलिसांनी आरोपी मन्याविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, त्याची चौकशी सुरू आहे.