दोन गटात मारहाण; नागपुरातील बजेरियात तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 01:21 AM2018-06-26T01:21:09+5:302018-06-26T01:22:21+5:30

बजेरियातील भोईपुरा येथे क्षुल्लक वादातून दोन परिवारामध्ये मारहाण झाली. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे काही वेळासाठी परिसरात तणाव निर्माण झाला होता.

Two groups assaulted; Tensions in the city of Nagpur at Bajeriya | दोन गटात मारहाण; नागपुरातील बजेरियात तणाव

दोन गटात मारहाण; नागपुरातील बजेरियात तणाव

Next
ठळक मुद्देखंडणी वसुलीसाठी धरमपेठेत गोंधळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बजेरियातील भोईपुरा येथे क्षुल्लक वादातून दोन परिवारामध्ये मारहाण झाली. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे काही वेळासाठी परिसरात तणाव निर्माण झाला होता.
पोलीस सूत्रानुसार भोईपुरातील नाथू मंदिरजवळ राहणाऱ्या २३ वर्षीय शिवानी विक्रांत गौर यांच्या घरी रात्री १२ वाजता ऋषभ निर्मल गौर (२३), भावेश यादव (२५), चेतना भावेश यादव (२१), निर्मल गौर (५२), कल्पना निर्मल गौर (४०), दिनेश गौर (३२), नैना दिनेश गौर (२५) आणि त्यांच्या इतर साथीदारांनी हल्ला केला. त्यांनी शिवानी, त्यांचे पती आणि कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली. शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. घरासमोरील भागाची तोडफोड केली. या घटनेचा बदला घेण्यासाठी शिवानीने पती विक्रांत गौर, राणी गौर (४५), लक्ष्मी गौर (५५), पंकज गौर (३०), विष्णू गौर (६०), विकास गौर (३०), विक्रांत गौर (२५) यांनी कल्पना निर्मल गौर यांच्या घरावर हल्ला केला. कल्पना व त्यांचे पती आरोपींना समजविण्यासाठी घराबाहेर आले. आरोपींनी शिवीगाळ करून त्यांना मारहाण केली. गणेशपेठ पोलिसांनी दोन्ही गटाविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.
दुचाकी वाहने पाडली, रेस्टॉरंट संचालकाला धमकावले
धरमपेठ येथील चिल्ड्रन्स पार्कजवळ रविवारी रात्री गुन्हेगारांनी तोडफोड करीत दुकाने बंद करायला लावली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अतिशय सुरक्षित समजल्या जाणाºया धरमपेठ परिसरात अशी घटना होणे गंभीर आहे.
ट्राफिक चिल्ड्रन्स पार्कजवळ अनेक रेस्टॉरंट आहे. शनिवारी आणि रविवारी येथे इतर दिवसांच्या तुलनेत अधिक गर्दी असते. रविवारी रात्री तीन-चार युवक येथे आले. ते रेस्टॉरंटसमोर उभे राहून गोंधळ घालू लागले. शिविगाळ करीत रेस्टॉरंट संचालकाला धमकावू लागले. रेस्टॉरंटसमोर पार्क असलेली दुचाकी वाहनेही त्यांनी खाली पाडली. ग्राहकांना जीवे मारण्याची धमकी देत तेथून बाहेर जाण्यास सांगितले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. अनेक ग्राहक कुटुंबासह आले होते. गोंधळ होत असल्याचे पाहून ते निघून गेले. दरम्यान घटनेची माहिती होता सीताबर्डी पोलीसही घटनास्थळी पोहोचले. पोलीस येताच गुन्हेगार फरार झाले. रेस्टॉरंट संचालकांनी उपस्थित ग्राहकांना शांत केले. पोलिसांनी विचारपूस केली असता कुणीही काही सांगितले नाही, त्यामुळे पोलीसही परत गेले.
असे सांगितले जाते की, गोंधळ घालणारे गुन्हेगार होते. ते खंडणी वसुलीसाठी आले होते. यापूर्वीही त्यांनी अनेकदा गोंधळ घातला आहे.
वणीच्या महिला डॉक्टरची पर्स लंपास
वणी (जि. यवतमाळ) येथील एका महिला डॉक्टरची पर्स सीताबर्डीतील चोरट्यांनी लंपास केली. २० जूनला घडलेल्या या घटनेची तक्रार उशिरा दाखल झाल्याने पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला.
डॉ. साहिबा अमरिन शेख नईम शेख (वय ३२, रा. जत्रा रोड वणी) २० जूनला नागपुरात आल्या होत्या. सायंकाळी ४ ते ४.४० या वेळेत त्या सिनेमॅक्स मॉल ते व्यंकटेश मार्केटमध्ये खरेदी करीत होत्या. तेवढ्या वेळेत गर्दीत संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या हॅण्डबॅगची चेन उघडून त्यातून पर्स काढून घेतली. या पर्समध्ये सोन्याचे दागिने आणि रोख ५ हजार रुपये होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी सीताबर्डी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Two groups assaulted; Tensions in the city of Nagpur at Bajeriya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.