नागपुरात गुटखा थुंकल्याने दोन गटात मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 01:38 AM2018-05-17T01:38:39+5:302018-05-17T01:38:51+5:30
गुटख्याची थुंकी कपड्यावर पडल्याने दोन गटात मारहाण झाली. दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला करून गोंधळ घातला. मंगळवारी रात्री यशोधरानगर परिसरातील विटभट्टी चौकात घडलेल्या या घटनेत पितापुत्र जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुटख्याची थुंकी कपड्यावर पडल्याने दोन गटात मारहाण झाली. दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला करून गोंधळ घातला. मंगळवारी रात्री यशोधरानगर परिसरातील विटभट्टी चौकात घडलेल्या या घटनेत पितापुत्र जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
टेका नाका येथील रहिवासी फऐजान मलिक यांच्या मामाचे विटभट्टी चौकात प्लायवूडचे दुकान आहे. दुकानाजवळच गोदाम आहे. मंगळवारी रात्री ८ वाजता ट्रकमधून प्लायवूड काढून फैजान ते गोदामात ठेवायला जात होते. प्लायवूड ठेवत असलेला मजूर आसिफने गुटखा खाल्ला होता. आसिफने पाणी पिऊन गुटखा जमिनीवर थुंकला. गोदामजवळच दारूचे आहे. त्याचवेळी दारूच्या दुकानातून धममदीपनगर येथील रहिवासी वीर निरंजन, भोला, गोलू, ताराचंद साहू बाहेर निघाले. आसिफने गुटखा थुंकल्याने त्याचे काही थेंब त्यांच्यावर पडले. यामुळे रागाच्या भरात त्यांनी फर्निचरच्या दुकानाची तोडफोड केली. या घटनेमुळे फैजान व त्याचे कुटुंबीयही दुखावले. फैजान, मुन्नाभाई, आसीफ यांनी ताराचंद साहूच्या घरावर हल्ला केला. त्याचे वडील भरत साहूला राफ्टरने मारून जखमी केले. वडिलांवर हल्ला होताना पाहून ताराचंद धावला. त्यालाही मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. यशोधरानगर पोलिसांनी दोन्ही गटाविरुद्ध हल्ला व मारहाणीचा गुन्हा दाखल केला.