नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरीत दोघांची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 08:21 PM2020-08-07T20:21:55+5:302020-08-07T20:25:15+5:30

‘बर्थ डे पार्टी’साठी नागपूरहून आलेले पाच तरुण बुटीबोरी येथील बसस्थानक चौकात सहज थांबले. त्यांचे बुटीबोरी येथील काही तरुणांशी ‘तू मला ओळखतो काय’ या किरकोळ कारणावरून भांडण झाले. ते विकोपास गेल्याने चाकूहल्ला केला. यात दोघांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले.

Two killed in Butibori in Nagpur district | नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरीत दोघांची हत्या

नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरीत दोघांची हत्या

Next
ठळक मुद्देकिरकोळ वादातून हल्ला, दोघे जखमी : सात जणांना अटक

लोकमत न्यज नेटवर्क
नागपूर(बुटीबोरी) : ‘बर्थ डे पार्टी’साठी नागपूरहून आलेले पाच तरुण बुटीबोरी येथील बसस्थानक चौकात सहज थांबले. त्यांचे बुटीबोरी येथील काही तरुणांशी ‘तू मला ओळखतो काय’ या किरकोळ कारणावरून भांडण झाले. ते विकोपास गेल्याने चाकूहल्ला केला. यात दोघांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. यात सात आरोपींना अटक केली आहे. ही घटना बुटीबोरी येथे गुरुवारी (दि. ६) सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास घडली.
इलियास जोसेफ लुईस व बादल अमुले, दोघेही रा. जरीपटका, नागपूर अशी मृतांची, प्रीत फ्रँकी पॉल, रा. नारा रोड, नागपूर व साजू ऊर्फ ख्रिस्तोफर सिमोन फ्रान्सिस, रा. ठाणा (पादरी) अशी जखमींची तर इजाज गुलाम शेख (३१), समीर गुलाम शेख (३६), साजिद कासम शेख (२१), सादाब ऊर्फ मुन्ना हनिफ खान (१९), शुभम शंकर वानखेडे (२१), फिरोज गुलाम शेख (३५) व टिन्या ऊर्फ अर्पित रामदास किटे (१९) सर्व रा. बुटीबोरी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.  
पवन, रा. बुटीबोरी याचा वाढदिवस असल्याने त्याचे मित्र इलियास, बादल, प्रीत व साजू हे ‘बर्थ डे पार्टी’साठी बुटीबोरी येथे आले होते. ते बसस्थानक चौकात थांबले असता त्यांचे लक्ष शेजारच्या चिकन सेंटरमध्ये बोलत उभ्या असलेल्या मुन्नाकडे गेले. यातील एकाने मुन्नाला ‘तू मला ओळखतो काय’ अशी विचारणा केली. त्यावरून भांडणाला सुरुवात झाली.
एकाने मुन्नाच्या कानशिलात हाणल्याने मुन्नाने त्याच्या मित्रांना बोलावले. त्या सर्वांनी इलियास व त्याच्या मित्रांवर चाकूने हल्ला चढविला. त्यात इलियास, बादल, प्रीत व साजू गंभीर जखमी झाले. यात बादलचा घटनास्थळीच तर इलियासचा नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोघांवर नागपूर येथे उपचार सुरू आहेत.,

सर्व जण गुन्हेगारी प्रवृत्तीचे
अटक करण्यात आलेले सर्व जण गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. ते नेहमीच बुटीबोरी येथील बसस्थानक चौकात उभे राहतात आणि क्षुल्लक कारणांवरून कुणाशीही वाद उकरून काढतात. या घटनेत सात जणांना अटक करण्यात आली असून, आरोपींची संख्या यापेक्षा अधिक आहे. उर्वरित आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला. अटकेतील आरोपींकडून चाकू जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Two killed in Butibori in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.