फोनवर अज्ञात व्यक्तीला ओटीपी सांगून गमावले दोन लाख रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 09:04 PM2021-11-19T21:04:35+5:302021-11-19T21:05:16+5:30

Nagpur News अनोळखी व्यक्तीला फोनवर ओटीपी क्रमांक सांगून एका व्यक्तीला आपले दोन लाख रुपये गमविण्याची पाळी बजरंगनगर अजनी येथील रहिवासी सुधीर बुधबावरे यांच्यावर आली.

Two lakh rupees lost by telling OTP to an unknown person on the phone | फोनवर अज्ञात व्यक्तीला ओटीपी सांगून गमावले दोन लाख रुपये

फोनवर अज्ञात व्यक्तीला ओटीपी सांगून गमावले दोन लाख रुपये

Next

नागपूर : अनोळखी व्यक्तीला फोनवर ओटीपी क्रमांक सांगून एका व्यक्तीला आपले दोन लाख रुपये गमविण्याची पाळी बजरंगनगर अजनी येथील रहिवासी सुधीर बुधबावरे यांच्यावर आली.

त्यांना अज्ञात आरोपीने फोन केला होता. त्यात त्याने क्रेडिट कार्डच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगितले. सुधीरच्या क्रेडिट कार्डची माहिती मिळविली. सुधीरच्या मोबाइल क्रमांकावर आलेल्या ओटीपी क्रमांकाचा पत्ता मिळवून घेतला. त्या आधारे सुधीरच्या खात्यातून दोन लाख रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर, आपली फसवणूक झाल्याचे सुधीरच्या लक्षात आले. अजनी पोलिसांनी फसवणूक तसेच आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

.............

Web Title: Two lakh rupees lost by telling OTP to an unknown person on the phone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.