मेडिकलच्या दोन डॉक्टरांना मारहाण : मार्ड संपावर जाण्याच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 08:44 PM2021-05-08T20:44:29+5:302021-05-08T20:49:58+5:30

medical doctors beaten मेयो, मेडिकलमधील इंटर्न डॉक्टरांचा संप शनिवारी मिटत नाही तोच मेडिकलच्या दोन निवासी डॉक्टरांना मारहाण झाल्याने निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने संपाचा इशारा दिला आहे. शनिवारी सायंकाळी मेडिकल चौकात फळ विकत घेण्यासाठी गेलेल्या दोन डॉक्टरांशी इंडीगो कारमधून आलेल्या तीन ते चार अज्ञात इसमाने वाद घालून मारहाण केली. या प्रकरणाच्या विरोधात ‘मार्ड’ने अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रात्री ८ वाजेपर्यंत दोषींना अटक न झाल्यास कामबंद आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

Two medical doctors beaten: Mard prepares to go on strike | मेडिकलच्या दोन डॉक्टरांना मारहाण : मार्ड संपावर जाण्याच्या तयारीत

मेडिकलच्या दोन डॉक्टरांना मारहाण : मार्ड संपावर जाण्याच्या तयारीत

Next
ठळक मुद्देकारमधून आलेल्या अज्ञात युवकांनी केली चौकात मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मेयो, मेडिकलमधील इंटर्न डॉक्टरांचा संप शनिवारी मिटत नाही तोच मेडिकलच्या दोन निवासी डॉक्टरांना मारहाण झाल्याने निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने संपाचा इशारा दिला आहे. शनिवारी सायंकाळी मेडिकल चौकात फळ विकत घेण्यासाठी गेलेल्या दोन डॉक्टरांशी इंडीगो कारमधून आलेल्या तीन ते चार अज्ञात इसमाने वाद घालून मारहाण केली. या प्रकरणाच्या विरोधात ‘मार्ड’ने अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रात्री ८ वाजेपर्यंत दोषींना अटक न झाल्यास कामबंद आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

प्राप्त माहितीनुसार, रमजान महिना सुरू असल्याने दोन निवासी डॉक्टरांचे उपवास (रोजे) सुरू आहेत. फळ विकत घेण्यासाठी सांयकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान मेडिकल चौकात आले. हातठेल्यावरील फळ विकत घेऊन दुचाकीवर बसत असताना एका अज्ञात इसमाला चुकून पाय लागला. डॉक्टरांनी माफी सुद्धा मागितली. परंतु त्या इसमासोबत असलेल्या दोघांनी हुज्जत घालण्यास सुरूवात केली. एकाने दुचाकीची चावी काढली डॉक्टरांनी स्वत:ची ओळख देत उपवास सुरू असल्याचेही सांगितले. परंतु त्या इसमाने आणखी दोघांना बोलविले. त्यांच्या हातात गोटे होते. त्याचवेळी त्या अज्ञात इसमाने डॉक्टरांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेने लोक जमा होताच मारहाण करणारे ‘एमएच३१ डीसी५६३३’ या क्रमांकाच्या इंडिगो कारमधून पळून गेले. याची माहिती इतर निवासी डॉक्टरांना मिळताच मेडिकलचे १००वर डॉक्टर मेडिकल चौकात जमा झाले. जखमी डॉक्टरांना मेडिकलच्या कॅज्युअल्टीत दाखल केले. मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. सजल बंसल यांच्या नेतृत्वात अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ‘लोकमत’शी बोलताना डॉ. बंसल म्हणाले, रात्री ८ वाजेपर्यंत दोषींना अटक न झाल्यास आम्ही कामबंद आंदोलन करू.

Web Title: Two medical doctors beaten: Mard prepares to go on strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.