ट्रॅव्हल्स बसमध्ये सापडला दोन महिन्याचा बाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 23:05 IST2018-09-21T23:02:42+5:302018-09-21T23:05:54+5:30
ट्रॅव्हल्स बसने प्रवास करीत असलेली एक महिला आपल्या दोन महिन्याच्या बाळाला बसमध्ये सोडून फरार झाली.

ट्रॅव्हल्स बसमध्ये सापडला दोन महिन्याचा बाळ
ठळक मुद्देअज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ट्रॅव्हल्स बसने प्रवास करीत असलेली एक महिला आपल्या दोन महिन्याच्या बाळाला बसमध्ये सोडून फरार झाली.
खासगी ट्रॅव्हल्स बस चालक याकुब शेख हा नाशिक येथून प्रवासी घेऊन नागपुरात आला होता. सर्व प्रवासी उतरल्यानंतर सकाळी ९ वाजता चालक कंडक्टरसोबत बसची सफाई करू लागला. त्यावेळी सीट क्रमांक २३ वर बाळाच्या रडण्याचा आवाज आला. जवळ जाऊन पाहिले असता दोन महिन्याचा बाळ होते. त्या सीटवर मधू नवाची महिला बसली होती. महिला बाळाला सोडून फरार झाली. याकूबने जरीपटका पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.