विदर्भात दोन नवीन परिमंडळ
By admin | Published: August 17, 2015 02:55 AM2015-08-17T02:55:49+5:302015-08-17T02:55:49+5:30
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या (महावितरण) नागपूर ग्रामीण परिमंडळाचे विभाजन करू न चंद्रपूर व गोंदिया तसेच अकोला परिमंडळाचे विभाजन करू न अकोला आणि अमरावती ...
महावितरणच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन : ऊर्जामंत्र्यांची घोषणा
नागपूर : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या (महावितरण) नागपूर ग्रामीण परिमंडळाचे विभाजन करू न चंद्रपूर व गोंदिया तसेच अकोला परिमंडळाचे विभाजन करू न अकोला आणि अमरावती परिमंडळ स्थापन करण्याची घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
महावितरणच्या नागपूर शहर परिमंडळ कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे शनिवारी बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर प्रवीण दटके होते. तर मंचावर आमदार सुधाकर देशमुख उपस्थित होते.
बावनकु ळे म्हणाले, पुढील महिनाभरात नवनिर्मित परिमंडळ कार्यालये सुरू होणार असून, यापैकी नागपूर ग्रामीण परिमंडळातील चंद्रपूर व वर्धा जिल्ह्याकरिता चंद्रपूर परिमंडळ, तर भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी गोंदिया परिमंडळ तसेच अकोला परिमंडळाचे विभाजन करू न अकोला, बुलढाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांसाठी अकोला येथे व अमरावती आणि यवतमाळसाठी अमरावती येथे स्वतंत्र परिमंडळ राहणार आहे. देशातील वीज क्षेत्रात महावितरणचा आवाका फार मोठा आहे. शिवाय महावितरणचे राज्याच्या विकासातही भरीव योगदान राहिले आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना दर्जेदार सेवा मिळावी यासाठी यंत्रणेच्या आधुनिकीकरणावर विशेष भर दिला जात आहे. यासाठी बीओटी तत्त्वावर किंवा खासगी गुंतवणुकीच्या मदतीने महावितरणची कार्यालये सुसज्ज करण्याचा मानस यावेळी त्यांनी व्यक्त केला.
नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वीज यंत्रणेच्या विकासासाठी ७४ कोटींचे वाटप करण्यात येत असून नागपूर शहरात स्मार्ट सिटीचे काम सुरू होताच शहरातील वीज तारा भूमिगत करण्यासाठी २५० कोटींचा निधी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. जास्तीत जास्त ग्राहकसेवा करण्यासाठी वीज ग्राहकांची संख्या नव्हे, तर भौगोलिक परिस्थितीचा विचार करू न कार्यालयांचे पुनर्गठन व्हावे, एखाद्या अभियंत्याचे पद रिक्त असेल तर ते पद आऊटसोर्र्सिंगच्या माध्यमातून भरण्याचे अधिकार संबंधित मुख्य अभियंता यांना दिल्या जातील, असेही बावनकुळे यांनी संकेत दिले.
महापौर प्रवीण दटके यांनी अध्यक्षीय भाषणातून महावितरण हा नागपूरच्या विकासात लक्ष देणारा सर्वांत मोठा विभाग असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला महावितरणच्या नागपूर शहर परिमंडळाचे मुख्य अभियंता मोहन झोडे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे, आर. पी. गोयंका, मुख्य अभियंता प्रसाद रेश्मे, अधीक्षक अभियंता अरविंद भादीकर, सुरेश मडावी, मनोहर लांडे, आर. एम. बुंदेले, आर आर. जनबंधू, यू. बी. शहारे, सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) सत्यजीत राजेशिर्के, उपसंचालक (दक्षता व सुरक्षा) सुमितकुमार, कार्यकारी अभियंता सचिन तालेवार, युवराज मेश्राम, के. पी. भिसे, व्ही. डी. राऊत, पी. एस. तगलपल्लीवार व ग्राहक तक्रार निवारण मंचच्या सदस्या गौरी चंद्रायन उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)