शौचालय पाणी प्रकरणात दोन अधिकारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 09:01 PM2018-03-21T21:01:38+5:302018-03-21T21:01:51+5:30

जिल्हा परिषदेच्या शालेय क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांना शौचालयातील नळाचे पाणी पाजल्या प्रकरणासंदर्भात द्विसदस्यीय चौकशी समितीच्या अहवालानुसार स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी योग्यरीत्या न हाताळल्याबद्दल शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश किसनराव धोटे, केंद्रप्रमुख बबन ढवळे यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच शिक्षण विस्तार अधिकारी छाया इंगोले यांच्यावर विभागीय चौकशी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली.

Two officials suspended in the toilet water case | शौचालय पाणी प्रकरणात दोन अधिकारी निलंबित

शौचालय पाणी प्रकरणात दोन अधिकारी निलंबित

Next
ठळक मुद्देप्रभाव लोकमतचाजि.प. सीईओ कादंबरी बलकवडे : शिक्षणाधिकारी यांच्या कार्यवाहीचा शासनाला प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : जिल्हा परिषदेच्या शालेय क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांना शौचालयातील नळाचे पाणी पाजल्या प्रकरणासंदर्भात द्विसदस्यीय चौकशी समितीच्या अहवालानुसार स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी योग्यरीत्या न हाताळल्याबद्दल शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश किसनराव धोटे, केंद्रप्रमुख बबन ढवळे यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच शिक्षण विस्तार अधिकारी छाया इंगोले यांच्यावर विभागीय चौकशी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली. क्रीडा स्पर्धेतील ही दिरंगाई ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणली होती, हे विशेष.
जिल्हा परिषद शालेय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात शिक्षणाधिकारी प्राथमिक दीपेंद्र लोखंडे यांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे. तसेच संबंधित कंत्राटदाराविरुद्ध सदर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून, तपासाच्या अधीन राहून संबंधित कंत्राटदाराला एक वर्षाकरिता काळ्या यादीत टाकण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहे, अशी माहिती मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली.
शौचालय पाणी प्रकरण या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेण्यात येऊन शालेय क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांना शौचालयातील नळाचे पाणी पाजल्या प्रकरणासंदर्भात सखोल चौकशी करण्यासाठी द्वि-सदसीय समिती गठित करण्यात आली होती. या समितीच्या अहवालानुसार शिक्षण विस्तार अधिकारी व नागपूर पंचायत समितीचे केंद्रप्रमुख यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच शिक्षण विस्तार अधिकारी छाया इंगोले यांच्यावर विभागीय चौकशीच्या अनुषंगाने ज्ञापन व जोडपत्र सादर करण्यात आले आहे.

Web Title: Two officials suspended in the toilet water case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.