पुन्हा आठ तासात दोघांना केले ठार; हत्यासत्राने नागपूर दहशतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:31 AM2017-11-24T00:31:29+5:302017-11-24T00:32:05+5:30

शहरातील विविध भागात गेल्या महिनाभरापासून हत्यासत्र सुरू झाल्याने नागपूरकर दहशतीत आले आहे. मंगळवारी २१ नोव्हेंबरला राहुल आग्रेकर नामक तरुणाचे लकडगंज भागातून अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली. या प्रकारामुळे शहरात थरार निर्माण झाला असतानाच आज गुरुवारी पुन्हा ८ तासात दोघांच्या हत्या झाल्या.

Two people killed in eight hours; The murder session in Nagpur, prevailed fear | पुन्हा आठ तासात दोघांना केले ठार; हत्यासत्राने नागपूर दहशतीत

पुन्हा आठ तासात दोघांना केले ठार; हत्यासत्राने नागपूर दहशतीत

Next
ठळक मुद्देदोन्ही हत्या डोक्यांवर प्रहार करून

आॅनलाईन लोकमत
नागपूर : शहरातील विविध भागात गेल्या महिनाभरापासून हत्यासत्र सुरू झाल्याने नागपूरकर दहशतीत आले आहे. मंगळवारी २१ नोव्हेंबरला राहुल आग्रेकर नामक तरुणाचे लकडगंज भागातून अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली. या प्रकारामुळे शहरात थरार निर्माण झाला असतानाच आज गुरुवारी पुन्हा ८ तासात दोघांच्या हत्या झाल्या. त्यामुळे पोलिसातही खळबळ उडाली आहे.
गुरुवारी सकाळी दिनेश धरमसिंग उईके (वय ३०, रा. दाते ले-आऊट) आणि दिनेश अशोक कोटांगळे (वय २५, रा. पन्नासे ले-आऊट) हे दोघे प्रतापनगरातील मजुरांच्या ठिय्यावर उभे होते. काम न मिळाल्याने ते सोबतच दारू प्यायला गेले. त्यानंतर दुपारी २ च्या सुमारास मेंढे ले-आउटमधील रचना अपार्टमेंटजवळ त्यांच्यात वाद सुरू झाला. उईकेने कोटांगळेच्या पत्नीला उद्देशून शिवीगाळ केली. त्यामुळे चिडलेल्या कोटांगळेने उईकेच्या डोक्यावर दगडाने ठेचून त्याची हत्या केली. त्यानंतर पळून गेला. माहिती कळताच सोनेगाव पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी शोधाशोध करून आरोपीला अटक केली.
दुसरी घटना रात्री १० च्या सुमारास खलासी लाईन, सदरमध्ये घडली. आरोपी प्रवीण चरणदास हुमणे आणि मृत अविनाश अरविंद मेहरा (वय ३३) हे दोघे साळे-भाटवे होय. ते मिलिंद तायवाडेच्या घरी भाड्याने राहत होते. मृत मेहराला दारूचे व्यसन होते. तो घरी आल्यानंतर पत्नीला बेदम मारहाण करायचा. गुरुवारी रात्री असेच झाले. मेहरा दारूच्या नशेत आला आणि त्याने पत्नीला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. तिचे दोन आठवड्यांपूर्वीच आॅपरेशन झाले आहे. ती वेदनांनी तडफडत भावाच्या घरी गेली. तिच्या मागेच मेहरा आला. ते पाहून त्याचा साळा प्रवीण याने बाजूची काठी उचलून मेहराच्या डोक्यावर मारली. एकाच फटक्यात मेहरा खाली पडला आणि गतप्राण झाला. आरडाओरड ऐकून बाजूची मंडळी धावली. त्यांनी सदर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पळून जाण्याच्या तयारीतील आरोपी प्रवीणला अटक केली.

 

 

Web Title: Two people killed in eight hours; The murder session in Nagpur, prevailed fear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.