गंगा-जमुनात ग्राहकांना पोलिसांकडून मारहाण, व्हिडीओ व्हायरल; २ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2022 12:16 PM2022-06-02T12:16:35+5:302022-06-02T12:22:11+5:30

काही व्यक्ती फिरकताच गंगा जमुना वस्तीत तैनात असलेल्या पोलिसांनी या ग्राहकांना दंडुके मारून त्यांना वस्तीतून हुसकावून लावले. हा व्हिडिओ सोशल माध्यमांवरदेखील व्हायरल झाला.

two police constable suspended after video goes viral of thrashing men in ganga jamuna red light area in nagpur | गंगा-जमुनात ग्राहकांना पोलिसांकडून मारहाण, व्हिडीओ व्हायरल; २ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

गंगा-जमुनात ग्राहकांना पोलिसांकडून मारहाण, व्हिडीओ व्हायरल; २ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस कधी संवेदनशील होणार? सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रश्न

नागपूर : वारांगनांसंदर्भात पोलिसांनी संवेदनशीलतेने वागण्याचे तसेच त्यांच्या अधिकारांचे संरक्षण करण्याचे आवाहन न्यायालयाने केले होते. परंतु नागपूरपोलिसांनी ही बाब गंभीरतेने घेतलेली नाही. गंगा जमुनात येणाऱ्या ग्राहकांना दोन कॉन्स्टेबलने मारहाण केल्याचा दावा करण्यात येत असून, याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने वारांगना व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये रोष निर्माण झाला होता. त्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दहा महिन्यांअगोदर गंगा-जमुना वस्तीला छावणीचे स्वरूप आले होते. वारांगनांच्या घरासमोर नोटिसा लावल्यामुळे हजारो वारांगनांसमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उभा ठाकला. मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने वारांगनांना सन्मानाने व्यवहाराचा मूलभूत हक्क असल्याचे स्पष्ट केल्यावर वारांगनांनी गंगा जमुनात आनंदोत्सव साजरा केला होता. वस्तीत काही व्यक्ती फिरकताच गंगा जमुना वस्तीत तैनात असलेल्या पोलिसांनी या ग्राहकांना दंडुके मारून त्यांना वस्तीतून हुसकावून लावले. हा व्हिडिओ सोशल माध्यमांवरदेखील व्हायरल झाला. यामुळे वारांगनांमध्ये तीव्र रोष उसळला असून, काही स्थानिक राजकारणी पोलिसांवर दबाव निर्माण करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

ग्राहकांना मारहाण होत असल्याचा व्हिडिओ मीदेखील पाहिला. सर्वोच्च न्यायालयाचा हा उघडपणे अवमान आहे. याबाबत आम्ही न्यायालयात जाऊ. वारांगनांना आता तरी मनुष्य व विशेष म्हणजे महिला समजून त्यांना सन्मानाची वागणूक द्या, अशी भूमिका सामाजिक कार्यकर्त्या ज्वाला धोटे यांनी मांडली.

गंगा जमुनात येणाऱ्या व्यक्तींना मारहाण करणाऱ्या दोन पोलिसांची ओळख पटली असून, त्यांच्या निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले आहेत. मी संबंधित कार्यक्षेत्राच्या पोलीस उपायुक्तांना व्हिडिओ पाहण्याची व दाव्यांची पडताळणी करण्यासदेखील सांगितले आहे. अशा प्रकारे गैरवर्तन होत असेल व लोकांना मारहाण होत असेल तर ते मानवी हक्कांचे स्पष्ट उल्लंघन आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार ायांनी स्पष्ट केले.

ग्राहक की अरेरावी करणारे व्यक्ती ?

यासंदर्भात लकडगंज पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता कुणीही प्रतिक्रिया दिली नाही. संबंधित व्यक्ती ग्राहक नव्हते तर ते त्या भागात फिरत असताना अरेरावी करत होते. त्यामुळे तैनात पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना हुसकावून लावले. जर यासाठी पोलिसांवर कारवाई झाली तर त्यांच्या मनोबलावर परिणाम होईल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

Web Title: two police constable suspended after video goes viral of thrashing men in ganga jamuna red light area in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.