नागपुरातील दोन ‘पॉलिटेक्निक’ महाविद्यालये होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 01:20 AM2019-07-04T01:20:04+5:302019-07-04T01:21:06+5:30

एक काळ होता जेव्हा ‘पॉलिटेक्निक’ अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांच्या उड्या पडत होत्या. मात्र मागील काही वर्षांपासून ‘पॉलिटेक्निक’ला उतरती कळा लागली आहे. दरवर्षी रिक्त जागांची संख्या वाढत चालली आहे. यातूनच नागपुरातून जुन्या महाविद्यालयांपैकी असलेल्या दत्ता मेघे पॉलिटेक्निक व केडीके नागपूर पॉलिटेक्निक बंद होण्याच्या मार्गावर आहेत. या महाविद्यालयांनी तसा अर्जच ‘एआयसीटीई’कडे दिला होता व काही दिवसातच संपूर्ण प्रक्रिया होऊन दोन्ही महाविद्यालये नेहमीसाठी बंद होणार आहेत.

Two 'Polytechnic' colleges in Nagpur will be closed | नागपुरातील दोन ‘पॉलिटेक्निक’ महाविद्यालये होणार बंद

नागपुरातील दोन ‘पॉलिटेक्निक’ महाविद्यालये होणार बंद

Next
ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या दुष्काळामुळे घेतला निर्णय : रिक्त जागांची डोकेदुखी वाढली

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : एक काळ होता जेव्हा ‘पॉलिटेक्निक’ अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांच्या उड्या पडत होत्या. मात्र मागील काही वर्षांपासून ‘पॉलिटेक्निक’ला उतरती कळा लागली आहे. दरवर्षी रिक्त जागांची संख्या वाढत चालली आहे. यातूनच नागपुरातून जुन्या महाविद्यालयांपैकी असलेल्या दत्ता मेघे पॉलिटेक्निक व केडीके नागपूर पॉलिटेक्निक बंद होण्याच्या मार्गावर आहेत. या महाविद्यालयांनी तसा अर्जच ‘एआयसीटीई’कडे दिला होता व काही दिवसातच संपूर्ण प्रक्रिया होऊन दोन्ही महाविद्यालये नेहमीसाठी बंद होणार आहेत.
दत्ता मेघे पॉलिटेक्निकची स्थापना १९८३ साली झाली होती, तर ‘केडीके’ नागपूर पॉलिटेक्निकची स्थापना काही काळाने झाली. सुरुवातीच्या काळात या महाविद्यालयाकडे विद्यार्थ्यांचा प्रचंड ओढा होता व प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा असायची. मात्र बदलत्या काळानुसार ‘पॉलिटेक्निक’कडे विद्यार्थ्यांचा कल कमी झाला. अर्ध्याहून अधिक जागा रिक्त राहायला लागल्या. मागील काही वर्षांपासून तर हे प्रमाण अधिक वाढले. नागपूर विभागात २० हजारांहून अधिक जागांपैकी ७० ते ८० टक्क्यांहून जागा रिक्त राहायला लागल्या. अशास्थितीत महाविद्यालयांना डोलारा सांभाळणे कठीण झाले होते. दोन्ही महाविद्यालयांतील रिक्त जागांचे प्रमाण प्रचंड वाढले होते.
महाविद्यालयांतील खर्च, शिक्षक-कर्मचाऱ्यांचे वेतन, इतर सुविधा यांच्यावरील खर्च वाढला होता. त्यातुलनेत विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची संख्या फारच अत्यल्प होती. यातूनच महाविद्यालय प्रशासनांनी महाविद्यालये बंद करण्याचाच निर्णय घेतला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
यासंदर्भात तंत्रशिक्षण संचालनालयाचे प्रभारी विभागीय सहसंचालक डॉ.चंद्रशेखर थोरात यांना संपर्क केला असता, त्यांनी या माहितीला दुजोरा दिला. या दोन्ही महाविद्यालयांकडून ‘बंद’चा अर्ज आला आहे. महाविद्यालये बंद करण्याचा प्रस्ताव त्यांनी अगोदर ‘एआयसीटीई’कडे पाठविला होता. तेथून मान्यता मिळाल्यानंतर संबंधित माहिती आता आमच्याकडे पाठविण्यात आली आहे. लवकरच पूर्ण प्रक्रिया होईल, असे त्यांनी सांगितले.
जुन्या विद्यार्थ्यांचे नुकसान नाही
ही महाविद्यालये बंद होणार असली म्हणजे जुन्या विद्यार्थ्यांचे नुकसान होईल असे नाही. मात्र यापुढे नवीन प्रवेश घेतले जाणार नाहीत. जुनी ‘बॅच’ बाहेर पडली की महाविद्यालये कायमस्वरूपी बंद होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
आणखी महाविद्यालये बंद होणार ?
विभागातील ६२ महाविद्यालयांमध्ये २१ हजार जागा आहेत. या जागांसाठी केवळ पाच हजारांच्या जवळपास अर्ज आले आहेत. मागील वर्षीदेखील अशीच स्थिती होती. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे पहिले प्राधान्य शासकीय ‘पॉलिटेक्निक’ महाविद्यालयाला आहे. एकट्या नागपूर शासकीय ‘पॉलिटेक्निक’ची क्षमता हजारहून अधिक आहे. येथे प्रवेश न मिळाल्यास विद्यार्थी खासगी महाविद्यालयांचा विचार करतात. त्यामुळे इतर महाविद्यालयांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रियेदरम्यानदेखील महाविद्यालयांना निराशाच हाती लागते. त्यामुळेच आणखी महाविद्यालयांकडून बंद करण्याचा प्रस्ताव पाठविल्या जाऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Two 'Polytechnic' colleges in Nagpur will be closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.