मुंबई-नागपूर दरम्यान दोन विशेष रेल्वेगाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 11:02 AM2021-02-27T11:02:17+5:302021-02-27T11:02:42+5:30
Nagpur News मध्य रेल्वेने मुंबई आणि नागपूरच्या दरम्यान दोन विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्य रेल्वेने मुंबई आणि नागपूरच्या दरम्यान दोन विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०२१७५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून शनिवारी २७ फेब्रुवारीला रात्री ११.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी नागपूरला दुपारी १.४५ वाजता पोहोचेल. रेल्वेगाडी क्रमांक ०२१७६ नागपूरवरून रविवारी २८ फेब्रुवारीला सायंकाळी ६.२० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला सकाळी ८.१५ वाजता पोहोचेल. दोन्ही गाड्यांना दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, चांदूर, धामनगाव, पुलगाव आणि वर्धा येथे थांबा देण्यात आला आहे. दोन्ही गाड्यांत २ एसी टू टायर, ३ एसी थ्री टायर, ८ स्लीपर आणि ५ सेकंड क्लास सीटिंग कोच राहतील.
..........