दोन विद्यार्थिनींची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 01:24 AM2017-11-12T01:24:03+5:302017-11-12T01:24:26+5:30

शुक्रवारी दुपारपासून बेपत्ता झालेल्या दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनींचे मृतदेह तलावात आढळल्याने खळबळ उडाली आहे.

Two students commit suicide | दोन विद्यार्थिनींची आत्महत्या

दोन विद्यार्थिनींची आत्महत्या

Next
ठळक मुद्देवर्गाला बुट्टी मारून फिरायला गेल्या : वडिलांना कळाल्यामुळे जीव दिला

लोकमत न्यूज नेटवर्क
कोराडी/नागपूर : शुक्रवारी दुपारपासून बेपत्ता झालेल्या दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनींचे मृतदेह तलावात आढळल्याने खळबळ उडाली आहे. मनीषा ईश्वर पटले (वय १७) आणि आशना रवींद्र रोकडे (वय १७), अशी मृत मुलींची नावे आहेत. त्यांनी दडपणात येऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.
मनीषा आणि आशना या दोघीही जरीपटक्यातील लहानुजीनगरात राहत होत्या. त्या दयानंद महाविद्यालयात १२ वीत शिकायच्या. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्या महाविद्यालयात जात आहोत, असे सांगून घरून निघाल्या. मात्र, सायंकाळ झाली तरी त्या परतल्या नाही. त्यामुळे पालकांनी शोधाशोध सुरू केली. ओळखीचे, नातेवाईक, मित्रमंडळी अशा सर्वांकडे विचारपूस करण्यात आली. त्या महाविद्यालयात आणि शिकवणी वर्गातही गेल्या नव्हत्या. दिवसभर त्या निशिकांत घनश्याम नागपुरे नामक मित्रासोबत दुचाकीने फिरत होत्या. असे त्यांच्या पालकांना कळले. मैत्रिणीने ही गोष्ट या दोघींना मोबाईलवर संपर्क करून कळविली. त्यामुळे त्या दडपणात आल्या. आपली आता घरी गेल्यानंतर खरडपट्टी काढली जाईल, या भीतीने त्या अस्वस्थ झाल्या. यावेळी त्या कोराडीच्या मालगुजारी तलावाजवळ होत्या. त्यांनी निशिकांतला हा प्रकार सांगून आत्महत्या करण्याचा विचारही बोलून दाखवला. हादरलेल्या निशिकांतने त्यांची कशीबशी समजूत काढली. एवढेच नव्हे तर मनीषाच्या वडिलांना फोन करून या दोघी आत्महत्या करण्याच्या विचारात असल्याचेही कळविले. वडिलांनी त्याला त्यांची समजूत काढण्यास सांगितले. घाबरू नका, आम्ही तिकडे येतो, असे म्हटले. दरम्यान, फोन करून निशिकांतने मागे वळून बघितले तेव्हा त्याला मनीषा आणि आशना दिसल्या नाही. त्याने पुन्हा मनीषाच्या वडिलांना फोन केला. नियंत्रण कक्षातही कळविले. मनीषाचे वडील पोहोचल्यानंतर
कुणावर होणार कारवाई ?
महाराजबाग, विविध तलाव, गार्डनमध्ये आणि शहराबाहेरच्या मार्गावर शाळकरी-महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी झाडाच्या आडोशाला बसलेले दिसतात. मनीषा-आशनाचाही असाच प्रकार आहे. पोलिसांना एक चिठ्ठी सापडली. त्यात नेमके काय लिहून आहे, ते कळायला मार्ग नाही. या प्रकरणात कोणती अन् कुणावर कारवाई करावी, असा विचार पोलीस करीत आहेत.

Web Title: Two students commit suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.