एकाच वेळी दोन शस्त्रक्रिया

By Admin | Published: February 10, 2016 03:28 AM2016-02-10T03:28:32+5:302016-02-10T03:28:32+5:30

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या हृदयशल्यचिकित्सक विभागाच्या शस्त्रक्रिया गृहात किडनी प्रत्यारोपण करण्यात आले.

Two surgery at the same time | एकाच वेळी दोन शस्त्रक्रिया

एकाच वेळी दोन शस्त्रक्रिया

googlenewsNext

नागपूर : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या हृदयशल्यचिकित्सक विभागाच्या शस्त्रक्रिया गृहात किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. यावेळी एका शस्त्रक्रिया गृहात आईची एक किडनी काढली जात होती तर लागूनच असलेल्या दुसऱ्या शस्त्रक्रिया गृहात मुलीची किडनी काढून तयारी केली जात होती. एकाचवेळी दोन्ही ठिकाणी शस्त्रक्रिया सुरू होत्या. डॉ. संजय कोलते यांनी सांगितले, किडनी प्रत्यारोपण झाल्यावर किडनीचा रंग हा गुलाबी असायला हवा, सोबतच तत्काळ लघवीचे कार्य सुरू होणे आवश्यक असते. या शस्त्रक्रियेत या दोन्ही कार्य यशस्वीरीत्या झाले. सध्या या दोघांनाही अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. पुढील २४ तास या दोघांसाठी महत्त्वाचे आहेत.
राज्यातील पहिल्या शासकीय रुग्णालयात किडनी प्रत्यारोपण केंद्र सुरू करण्याचा मान मिळविल्याबद्दल सर्व चमूचे वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, उपसंचालक डॉ. प्रकाश वाकोडे, डॉ. सुधीर गुप्ता, डॉ. मुकुंद देशपांडे, डॉ. सतीश दास यांनी अभिनंदन केले.

Web Title: Two surgery at the same time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.