‘दोन गोष्टी आर्इंसाठी - दोन गोष्टी बाबांसाठी’ आज

By admin | Published: November 14, 2014 12:46 AM2014-11-14T00:46:31+5:302014-11-14T00:46:31+5:30

एकीकडे आधुनिकता, पाश्च्यात्त्य संस्कृतीचे अनुकरण, अ‍ॅडव्हान्स टेक्नालॉजी, वाढलेली चढाओढ तर दुसरीकडे घरात राहूनही हरवलेला संवाद, यशाच्या मार्गावरील दिसेनासे झालेले विश्रांतीचे थांबे,

'Two things to the Lord - for two things' today | ‘दोन गोष्टी आर्इंसाठी - दोन गोष्टी बाबांसाठी’ आज

‘दोन गोष्टी आर्इंसाठी - दोन गोष्टी बाबांसाठी’ आज

Next

नागपूर : एकीकडे आधुनिकता, पाश्च्यात्त्य संस्कृतीचे अनुकरण, अ‍ॅडव्हान्स टेक्नालॉजी, वाढलेली चढाओढ तर दुसरीकडे घरात राहूनही हरवलेला संवाद, यशाच्या मार्गावरील दिसेनासे झालेले विश्रांतीचे थांबे, यातून येणारे नैराश्य, काय करावे, हा सर्वांनाच पडलेला प्रश्न. याच्या उत्तरासाठी लोकमत सखी मंच आणि कॅम्पस क्लब यांच्यावतीने ‘दोन गोष्टी आर्इंसाठी, दोन गोष्टी बाबांसाठी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
बालक दिनाच्यानिमित्ताने आयोजित हा कार्यक्रम १४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता, सीताबर्डी येथील माहेश्वरी भवनात आयोजित करण्यात आला आहे. यात प्रसिद्ध वक्ते आणि आॅक्सफोर्ड अकॅडमीचे संचालक डॉ. संजय रघटाटे हे मुलांच्या करिअरविषयी आणि भविष्यात घेण्यात येणाऱ्या योग्य निर्णयासंबंधी मार्गदर्शन करतील. सृजन या संस्थेच्या संचालिका आणि प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अनुपमा गडकरी या पालकांच्या आणि मुलांच्या मानसिकतेवर प्रकाश टाकतील, सोबतच उपस्थितांशी संवादही साधतील. बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण मिश्रा हे मुलांमध्ये वाढत असलेल्या दमा या आजारावर मार्गदर्शन करून उपाययोजना सांगतील. विशेष म्हणजे या दिवशी जन्मलेल्या मुलांचे वाढदिवस सामूहिकरीत्या साजरे करण्यात येईल. या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी नेहा जोशी यांच्याशी किंवा अनुश्री बक्षी यांच्या २४२९३५५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.(प्रतिनिधी)

Web Title: 'Two things to the Lord - for two things' today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.