धंतोली येथे दोन टॉवरची उभारणी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:12 AM2021-09-17T04:12:04+5:302021-09-17T04:12:04+5:30
नागपूर : महामेट्रोने यशवंत स्टेडियम समोरील जागेचा व्यावसायिक विकास आणि बांधकाम करण्यासाठी पुनर्रचना केली आहे. या ठिकाणी आता एकऐवजी ...
नागपूर : महामेट्रोने यशवंत स्टेडियम समोरील जागेचा व्यावसायिक विकास आणि बांधकाम करण्यासाठी पुनर्रचना केली आहे. या ठिकाणी आता एकऐवजी दोन टॉवर पीपीपी तत्त्वावर बांधण्यात येत आहेत. स्थानिक बोलीदारांकडून चांगला प्रतिसाद मिळावा, या उद्देशाने महामेट्रोने या जागेवर बदल केले आहेत. या प्रकल्पामुळे सीताबर्डी भागात पार्किंगची मोठी व्यवस्था होईल आणि नागपूर शहराचे रूप बदलणार आहे.
यशवंत स्टेडियम समोरील दोन भूखंडाचे क्षेत्रफळ ७७,७५१ व ७५,६९६ चौरस फूट असून, जमिनीचा वापर व्यावसायिक उपक्रमाकरिता आहे. महाराष्ट्र शासनाच्या ट्रान्झिट ओरिएन्टेड डेव्हलपमेंट (टीओडी) धोरणानुसार या भूखंडाचा फ्लोअर स्पेस इन्डेक्स (एफएसआय) ४.० असून, भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) सुमारे २८९ फूट उंचीकरिता परवानगी प्रदान केली आहे. दोन्ही टॉवर्स सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशनला फूट ओव्हरब्रिजच्या (एफओबी) सहाय्याने जोडण्यात येणार आहे.