दोन ट्रकची आपसात धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:07 AM2021-06-11T04:07:19+5:302021-06-11T04:07:19+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क पारशिवनी : काेळसा घेऊन वेगात जाणाऱ्या ट्रकने समाेर रेती घेऊन जात असलेल्या ट्रकला मागून जाेरात धडक ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : काेळसा घेऊन वेगात जाणाऱ्या ट्रकने समाेर रेती घेऊन जात असलेल्या ट्रकला मागून जाेरात धडक दिली. यात दाेन्ही ट्रकचे नुकसान झाले असून, कुणालाही फारशी गंभीर दुखापत झाली नाही. ही घटना पारशिवनी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पारशिवनी-आमडी फाटा मार्गावर बुधवारी (दि. ९) रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास घडली.
एमएच-२७/बीएक्स-५१५३ क्रमांकाचा ट्रक पेंच नदीवरील पिपळा रेतीघाटातून रेती घेऊन पारशिवनी मार्गे अमरावतीला जाण्यासाठी निघाला होता. हा ट्रक पिपळामार्गे पालोरा गावाजवळ वळण घेत असताना आमडी फाटाकडून पारशिवनीकडे काेळसा घेऊन येणाऱ्या एमएच-४०/एके-३०४१ क्रमांकाच्या ट्रकने रेती घेऊन येत असलेल्या ट्रकला मागून जाेरात धडक दिली. यात दोन्ही ट्रकचे नुकसान झाले असून, कुणालाही दुखापत झाली नाही. याप्रकरणी पारशिवनी पाेलिसांनी नाेंद करून तपास सुरू केला आहे.
...
रेतीची धाेकादायक वाहतूक
पारशिवनी तालुक्यातील कन्हान नदीसाेबतच पेंच नदीच्या पात्रातून माेठ्या प्रमाणात रेतीची उचल केली जाते. सध्या पेंच नदीवरील काही रेतीघाटांचे लिलाव करण्यात आल्याने त्यात रेतीचा रात्रंदिवस उपसा सुरू आहे. या घाटांमधील रेतीची पालोरा-डोरली, पालोरा-पारशिवनी, पारशिवनी-नागपूर या मार्गाने ओव्हरलाेड वाहतूक केली जाते. रेतीची वाहतूक करणारे ट्रक सुसाट धावत असल्याने व त्यात अपघात हाेत असल्याने ही वाहतूक धाेकादायक झाली आहे.
===Photopath===
100621\img_20210609_211351.jpg
===Caption===
अपघात