दुचाकी चाेरटे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:07 AM2021-05-17T04:07:38+5:302021-05-17T04:07:38+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क वाडी : हाॅस्पिटलच्या वाहनतळातून दुचाकी चाेरून नेणाऱ्या दाेन चाेरट्यांना वाडी पाेलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दुचाकी जप्त ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
वाडी : हाॅस्पिटलच्या वाहनतळातून दुचाकी चाेरून नेणाऱ्या दाेन चाेरट्यांना वाडी पाेलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दुचाकी जप्त करण्यात आली असून, ही कारवाई शुक्रवारी (दि. १४) करण्यात आली.
राजेश जंगलू परतेकी (२०) व विशाल विनोद बागडे (१९, दाेघेही रा. धापेवाडा, ता. कळमेश्वर) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. अविनाश संजय नेऊल (२०, रा. माहुरझरी, ता. कळमेश्वर) हा शनिवारी (दि. ८) एमएच ४० बीएक्स ९१६६ क्रमांकाच्या दुचाकीने वडधामणा - सुराबर्डी येथील दुधे हाॅस्पिटलमध्ये गेला हाेता. त्याने ती दुचाकी हाॅस्पिटलच्या वाहनतळात ठेवली आणि हाॅस्पिटलमध्ये निघून गेला. ती चाेरीला गेल्याचे लक्षात येताच त्याने पाेलिसात तक्रार नाेंदविली हाेती.
दरम्यान, वाडी पाेलिसांचे पथक लाव्हा - साेनबानगर भागात शुक्रवारी गस्तीवर असताना त्यांना ती दुचाकी आढळून आली. त्यांनी त्या दुचाकीवरील दाेघांना थांबण्याचा इशारा करताच दाेघांनीही पळ काढला. मात्र, त्यांनी पाठलाग करून दाेघांनाही ताब्यात घेत कसून चाैकशी केली. यात राजेश व विशालपैकी एकाने ती दुचाकी चाेरीची असल्याचे तसेच ती दुधे हाॅस्पिटलमधून चाेरून नेल्याचे कबूल केल्याने त्यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी वाडी पाेलिसांनी भादंवि ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पाेलीस उपनिरीक्षक अविनाश जायभाये, हवालदार सुनील मस्के यांच्या पथकाने केली.
===Photopath===
160521\img_20210516_132222.jpg
===Caption===
मोटारसायकल चोरटे पोलिसांच्या ताब्यात