भरधाव दुचाकी ट्रॅक्टरवर आदळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:37 AM2021-02-05T04:37:58+5:302021-02-05T04:37:58+5:30

सावनेर/पाटणसावंगी : चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेली माेटारसायकल राेडलगत उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर मागून धडकली. त्यात माेटारसायकलवरील दाेघांचा घटनास्थळीच मृत्यू ...

The two-wheeler collided with a tractor | भरधाव दुचाकी ट्रॅक्टरवर आदळली

भरधाव दुचाकी ट्रॅक्टरवर आदळली

Next

सावनेर/पाटणसावंगी : चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेली माेटारसायकल राेडलगत उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर मागून धडकली. त्यात माेटारसायकलवरील दाेघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना सावनेर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-सावनेर मार्गावरील बाेरूजवाडा शिवारात साेमवारी (दि. १) रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.

शंकर दामाेदर देवके (वय २८, रा. पाटणसावंगी, ता. सावनेर) व राकेश शेंडे (४५, रा. मानेगाव, ता. सावनेर) अशी मृतांची नावे आहेत. शंकरचे वडील दामाेदर देवके हे घर बांधकाम कंत्राटदार असून, शंकर व राकेश त्यांच्याकडे काम करायचे. राकेश हा मिस्त्री हाेता. त्यांचे पाटणसावंगी येथे घराचे काम सुरू हाेते. मात्र, शंकर व राकेश काही कामानिमित्त एमएच-४०/बीपी-३८१७ क्रमांकाच्या माेटारसायकलने सावनेरला गेले हाेते. काम आटाेपल्यानंतर ते याच माेटारसायकलने पाटणसावंगीला परत येत हाेते.

शंकर हा राकेशला त्यांच्या गावी साेडून परत येणार हाेता. दरम्यान, ते बाेरूजवाडा-माळेगावच्या मध्ये असलेल्या पेपर मिलजवळ पाेहाेचताच शंकरचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि वेगात असलेली माेटारसायकल राेडलगत उभ्या असलेल्या एमएच-४०/एल-१५६१ क्रमांकाच्या ट्रॅक्टरवर धडकली. पंक्चर असल्याने हा ट्रॅक्टर चाकाला जॅक लावून उभा हाेता. धडक एवढी जबर हाेती की, दाेघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी दाेन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सावनेर येथील शासकीय रुग्णालयात पाठविले. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून ट्रॅक्टरचालक दिलीप नत्थू उईके (३१, रा. कांडली, ता. परतवाडा, जिल्हा अमरावती) यास चाैकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

Web Title: The two-wheeler collided with a tractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.