बोलेरोच्या धडकेत दुचाकी चालक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:14 AM2021-03-04T04:14:57+5:302021-03-04T04:14:57+5:30
काटोल : बेलोरो आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना काटोल-कोंढाळी मार्गावर मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. ...
काटोल : बेलोरो आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना काटोल-कोंढाळी मार्गावर मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. यात दुचाकी चालक अमोल जगन तभाने (२५, रा. रिधोरा) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत. मंगळवारी अमोल हा अॅक्टिवा गाडी क्रमांक एम.एच. ४० / सी.ई. २७८६ ने काटोलकडून रिधोऱ्याकडे जात असताना समोरून भरधाव येणाऱ्या बोलेरो क्रमांक एम.एच.२७ / बी.एफ.११६७ च्या चालकाने जोराची धडक दिली. त्यामध्ये अमोल तभाने गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच काटोल पोलिसांनी घटनास्थळ गाठून अमोलला ग्रामीण रुग्णालय, काटोल येथे उपचारासाठी दाखल केले. तिथे प्राथमिक उपचारानंतर त्याला नागपूर येथे दाखल केले. या प्रकरणाचा तपास काटोल पोलीस करीत आहेत.