ट्रेलरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:38 AM2021-02-05T04:38:00+5:302021-02-05T04:38:00+5:30

कळमेश्वर : भरधाव ट्रेलरने दुचाकीस्वाराला धडक दिली. त्यात ट्रेलरचे चाक अंगावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना कळमेश्वर ...

Two-wheeler killed in trailer collision | ट्रेलरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

ट्रेलरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Next

कळमेश्वर : भरधाव ट्रेलरने दुचाकीस्वाराला धडक दिली. त्यात ट्रेलरचे चाक अंगावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना कळमेश्वर एमआयडीसी बायपास चाैकात साेमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. मृताची ओळख पटली नसल्याने त्याचे नाव कळू शकले नाही.

पाेलिसांच्या माहितीनुसार, सीजी-०४/जेडी-८२२५ क्रमांकाच्या ट्रेलरने एमएच-४०/एएस-९७५० क्रमांकाच्या दुचाकीस्वाराला जाेरात धडक दिली. त्यातच भरधाव ट्रेलरचे चाक अंगावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर रस्त्याच्या कडेला ट्रेलर उभा करून चालक पसार झाला. घटनेची माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. वृत्त लिहीस्ताेवर मृत दुचाकीस्वाराची ओळख पटली नसल्याने त्याचे नाव कळू शकले नाही. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी ट्रेलरचालकाविरुद्ध गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक प्रवीण मुंडे, नाईक पाेलीस पाटील करीत आहेत.

Web Title: Two-wheeler killed in trailer collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.