दुचाकी स्लीप, चालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:09 AM2021-03-10T04:09:52+5:302021-03-10T04:09:52+5:30
काटाेल : चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेली माेटरसायकल स्लीप झाली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने दुचाकी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ...
काटाेल : चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेली माेटरसायकल स्लीप झाली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने दुचाकी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर त्याचा मित्र किरकाेळ जखमी झाला. ही घटना काटाेल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील काटाेल-जलालखेडा मार्गावरील ढिवरवाडी शिवारात घडली.
नरेश चावरिया (३०, रा. हत्तीखाना, काटाेल) असे मृत दुचाकीचालकाचे नाव असून, संचित पुरुषाेत्तम खडसे, रा. काटाेल असे किरकाेळ जखमीचे नाव आहे. दाेघेही मित्र असून, ते एमएच-४०/एए-७२६६ क्रमांकाच्या माेटरसायकलने पारडसिंगा येथून काटाेलला येत हाेते. दरम्यान, ढिवरवाडी शिवारात नरेशचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि ती स्लीप झाल्याने दाेघेही काेसळले. यात नरेश गंभीर तर संचित किरकाेळ जखमी झाला. नरेशला काटाेल येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमाेपचार केल्यानंतर नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे उपचारादम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी भादंवि २७९, ३३७, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा पुढील तपास सहायक फाैजदार जवाहर चव्हाण करीत आहेत.