दुचाकी स्लीप, चालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:10 AM2021-09-22T04:10:29+5:302021-09-22T04:10:29+5:30
माैदा : चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेली माेटरसायकल स्लीप झाली आणि चालक खाली काेसळल्याने गंभीर जखमी झाला. पुढे उपचारादरम्यान ...
माैदा : चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेली माेटरसायकल स्लीप झाली आणि चालक खाली काेसळल्याने गंभीर जखमी झाला. पुढे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबाडी-केसाेरी मार्गावर नुकतीच घडली.
ईश्वर महादेव गायधनी (३५, रा. वरंभा, ता. कामठी) असे मृताचे नाव आहे. ईश्वर एमएच-४०/सीएम-००४७ क्रमांकाच्या माेटरसायकलने वडाेदा (ता. कामठी) शिवारातून वरंभा येथे घरी जात हाेता. दरम्यान, अंबाडी-केसाेरी मार्गावरील केसाेरी फाटा परिसरात त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि दुचाकी स्लीप झाल्याने ताे खाली काेसळला. यात त्याच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला लगेच नागपूर शहरातील हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी भादंवि २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक साेनेकर करीत आहेत.