गुरुद्वारातील दानपेटी फोडणारे दोघे अटकेत, दोन फरार

By दयानंद पाईकराव | Published: May 20, 2024 08:31 PM2024-05-20T20:31:21+5:302024-05-20T20:31:39+5:30

२० हजार रुपये केले जप्त : कळमना पोलिसांची कारवाई

Two who broke donation box in Gurdwara arrested, two absconding | गुरुद्वारातील दानपेटी फोडणारे दोघे अटकेत, दोन फरार

गुरुद्वारातील दानपेटी फोडणारे दोघे अटकेत, दोन फरार

नागपूर: मिनिमातानगरातील गुरुद्वारामधील दानपेटी फोडून एक ते दीड लाख रुपये चोरून नेणाऱ्या आरोपीपेकी दोघांना कळमना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून या चोरीतील दोन आरोपी अद्यापही फरार आहेत. दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी २० हजार ५६६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हिमांशु प्रविण यादव (२२, रा. नालंदानगर, भगवाननगर अजनी) आणि सुजल राजु गिरी (२०, रा. न्यु केलासनगर मानेवाडा रोड अजनी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. बुधवारी १५ मे रोजी रात्री २.३० वाजताच्या दरम्यान आरोपींनी कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत मिनिमातानगर येथील गुरु घासीदास सतनामी समाज, मानव उत्थान ट्रस्ट येथील गुरुद्वाराच्या लोखंडी दाराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला होता. चोरटयांनी दानपेटीचे कुलुप तोडून त्यातील अंदाजे एक ते दीड लाख रुपये चोरून नेले होते. या प्रकरणी नरेंद्र हिरालाल बघेल (४४, रा. मिनिमातानगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या तपासात कळमना ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोकुल महाजन आणि अंमलदारांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून त्यांनी आरोपी हिमांशु आणि सुजलला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी दानपेटी फोडून रक्कम चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींच्या ताब्यातून १, २ व ५ रुपयांची नाणे व नोटा असा २० हजार ५६६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोकुळ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक उज्वल इंगोले, उपनिरीक्षक संतोष रामलोड यांनी केली.

दोन आरोपी अद्यापही फरार
दानपेटी फोडून रक्कम चोरी करणारे हिमांशु आणि सुजलला अटक करून पोलिसांनी त्यांची चौकशी केली. चौकशीत आरोपींनी आपल्यासोबत आणखी दोन साथीदार या गुन्ह्यात असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे फरार असलेले दोन साथीदार पकडल्यानंतर या गुन्ह्यातील आणखी रक्कम जप्त होऊ शकते. त्यामुळे कळमना पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

Web Title: Two who broke donation box in Gurdwara arrested, two absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.