दारू तस्करी करणाºया दोन महिलांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 12:36 AM2017-09-16T00:36:59+5:302017-09-16T00:37:23+5:30

दारुबंदी झालेल्या चंद्रपूर जिल्ह्यात रेल्वेमार्गाने दारूची तस्करी सुरूच असून शुक्रवारी रेल्वे सुरक्षा दलाने दोन महिलांना रंगेहाथ पकडून.....

Two women arrested for smuggling alcohol | दारू तस्करी करणाºया दोन महिलांना अटक

दारू तस्करी करणाºया दोन महिलांना अटक

Next
ठळक मुद्देरेल्वे सुरक्षा दलाची रेल्वेस्थानकावर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दारुबंदी झालेल्या चंद्रपूर जिल्ह्यात रेल्वेमार्गाने दारूची तस्करी सुरूच असून शुक्रवारी रेल्वे सुरक्षा दलाने दोन महिलांना रंगेहाथ पकडून त्यांच्याकडून १३४४० रुपये किमतीच्या दारूच्या १०८ बॉटल जप्त केल्या आहेत.
रेल्वे सुरक्षा दलाचा जवान जसवीर सिंह यास रेल्वेस्थानकावर दारूची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. मिळालेली सूचना त्याने आरपीएफचे कमांडंट ज्योती कुमार सतीजा यांना दिली. त्यांनी निरीक्षक वीरेंद्र वानखेडे, उपनिरीक्षक कृष्णा नंद राय, विकास शर्मा, जसवीर सिंह, उषा तिग्गा यांची चमू गठित केली. चमूने रेल्वेस्थानकावर गस्त घातली असता सकाळी ११.४० वाजता संत्रा मार्केटकडील पुलाजवळ एक महिला संशयास्पद स्थितीत आढळली. तिने आपले नाव रोशनी महेश गुजर (३०) रा चंद्रपूर असे सांगितले. तिच्या जवळील बॅगची तपासणी केली असता त्यात दारूच्या १९२० रुपये किमतीच्या १२ बॉटल होत्या. दुसºया घटनेत दुपारी १.१० वाजता संत्रा मार्केटकडील गेटजवळ एक महिला संशयास्पद अवस्थेत आढळली. तिने आपले नाव शिल्पा अशोक यादव (२३) सांगितले. तिच्या जवळील बॅगची तपासणी केली असता त्यात दारूच्या ११५२० रुपये किमतीच्या ९६ बॉटल आढळल्या. जप्त करण्यात आलेली दारू आणि महिलांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आले.

Web Title: Two women arrested for smuggling alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.