स्क्रब टायफसमुळे दोन महिलांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 09:38 PM2018-09-06T21:38:01+5:302018-09-06T21:40:38+5:30
स्क्रब टायफसचा संक्रमित अविकसित कीटक चावल्यामुळे होणाऱ्या या रोगाने पुन्हा दोन रुग्णांचे बळी घेतले आहे. मृत्यूचा आकडा आता १४ वर गेला असून रुग्णांची संख्या ८० वर पोहचली आहे. एकट्या नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ३७ रुग्णांची नोंद झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्क्रब टायफसचा संक्रमित अविकसित कीटक चावल्यामुळे होणाऱ्या या रोगाने पुन्हा दोन रुग्णांचे बळी घेतले आहे. मृत्यूचा आकडा आता १४ वर गेला असून रुग्णांची संख्या ८० वर पोहचली आहे. एकट्या नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ३७ रुग्णांची नोंद झाली आहे.
चित्रलेखा शाहू (३७) रा. कळमना नागपूर तर सीमा भलावी (२६) रा. सिवनी, मध्य प्रदेश असे मृताचे नाव आहे. ‘चिगर माईट्स’ कीटकामुळे होणाºया स्क्रब टायफसच्या निदानासाठी व तत्काळ उपचारासाठी आरोग्य विभागासह, मेडिकल, मेयो रुग्णालयांनी कंबर कसली असलीतरी मृत्यूची संख्या वाढतच आहे. शहर आणि शहरालगत परिसरात हा आजार मोठ्या संख्येत फोफावत आहे. गुरुवारपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्याने रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मेयोमध्ये १४ रुग्ण
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये (मेयो) आतापर्यंत १४ रुग्ण आढळून आले असून पहिल्यांदाच दोन महिलांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यातील चित्रलेखा या महिलेला ३० आॅगस्ट रोजी तर सीमा हिला १० आॅगस्ट रोजी मेयोमध्ये भरती करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. डॉक्टरांच्या मते, स्क्रब टायफससोबतच या दोन्ही महिलांना हृदयाचा गंभीर आजार होता.
स्क्रब टायफसची स्थिती
जिल्हा रुग्ण मृताची संख्या
नागपूर २६ ०५
शहर ११ ०३
गोंदिया ०२ ००
वर्धा ०५ ००
गडचिरोली ०४ ००
भंडारा ०४ ०१
अकोला ०२ ०१
अमरावती ०८ ००
चंद्रपूर ०१ ००
इतर राज्य
मध्य प्रदेश १६ ०४
आंध्र प्रदेश ०१ ००