स्वाईन फ्लूने दोन महिलांचा मृत्यू

By admin | Published: February 24, 2015 02:22 AM2015-02-24T02:22:39+5:302015-02-24T02:22:39+5:30

स्वाईन फ्लू बळीची संख्या वाढतच आहे. मंगळवारी आणखी दोन महिला रुग्णांचा मृत्यू झाला.

Two women die of swine flu | स्वाईन फ्लूने दोन महिलांचा मृत्यू

स्वाईन फ्लूने दोन महिलांचा मृत्यू

Next

नागपूर : स्वाईन फ्लू बळीची संख्या वाढतच आहे. मंगळवारी आणखी दोन महिला रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत नागपूर विभागात स्वाईन फ्लूने ४३ रुग्णांचे बळी घेतले असून, आज १२ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. रुग्णांची संख्या २२७ झाली आहे.
शोभा शेंडे (४०) रा. कैलासनगर व वैशाली चौधरी (३४) अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शोभा शेंडे या आॅरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये १६ फेब्रुवारी रोजी स्वाईन फ्लू संशयित म्हणून भरती झाल्या. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या नमुन्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. रविवारी रात्री ११.३० वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आॅरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये नऊ पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.
वैशाली चौधरी ही महिला २० फेब्रुवारी रोजी मेडिकलच्या स्वाईन फ्लू वॉर्डात भरती झाली. २२ फेब्रुवारीला स्वाईन फ्लू असल्याचे निष्पन्न झाले. आज सायंकाळी ६.३० वाजता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. शहरात आतापर्यंत स्वाईन फ्लूचे १५७, नागपूर ग्रामीणमध्ये २१, वर्ध्यासह इतर जिल्ह्यांत २४, अकोल्यातील तीन तर इतर मध्य प्रदेशातील २१ तर आंध्र प्रदेशातील एका रुग्णाला, असे एकूण २२७ रुग्णाला स्वाईन फ्लू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरात आतापर्यंत २६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नागपूर ग्रामीणसह इतर जिल्हे आणि राज्यातील अशा एकूण १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूची वाढती आकडेवारी पाहता प्रशासन अद्यापही युद्धपातळीवर उपाययोजना करीत नसल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)
मनपाकडे केवळ ५०० गोळ्या शिल्लक
४स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. स्वाईन फ्लूचा उद्रेक होऊन दोन महिने होत असतानाही आरोग्य विभाग बैठकीतच अडकून आहे. मंत्री आणि अधिकारी आश्वासनापलीकडे काहीच करीत नसल्याचे वास्तव आहे. दुसरीकडे महानगरपालिकेचा आरोग्य विभाग बघण्याच्या भूमिकेत आहे. संशयित रुग्ण आढळून आल्यास मेयो, मेडिकलला रेफर, कागदोपत्री जनजागृती आणि पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरी जाऊन औषधांचे वितरण यापलीकडे मनपाकडे काम नाही. आतातर मनपाकडे केवळ ५०० गोळ्या शिल्लक असल्याची माहिती आहे.

Web Title: Two women die of swine flu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.