पंढरपुरातील चंद्रभागा नदीत नरखेड तालुक्यातील दाेघे बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2022 11:16 AM2022-07-11T11:16:07+5:302022-07-11T11:51:55+5:30

पंढरपूरला दर्शनाला गेलेल्या नागपूर जिल्ह्यातील दोन तरुण विठ्ठल भक्तांचा चंद्रभागेत बुडून मृत्यू

two youth in Narkhed taluka drowned in Chandrabhaga river in Pandharpur | पंढरपुरातील चंद्रभागा नदीत नरखेड तालुक्यातील दाेघे बुडाले

पंढरपुरातील चंद्रभागा नदीत नरखेड तालुक्यातील दाेघे बुडाले

googlenewsNext
ठळक मुद्देजलालखेडा व नारसिंगी येथील रहिवासी : दर्शनाला गेले हाेते

जलालखेडा : आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुख्मिणीच्या दर्शनासाठी गेलेल्या तीन मित्रांपैकी दाेघांचा पंढरपूर (जि. साेलापूर) येथील चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू झाला. दाेघेही नरखेड तालुक्यातील जलालखेडा व नारसिंगी येथील रहिवासी असून, ते रविवारी (दि. १०) सकाळी अंघाेळ करण्यासाठी नदीत उतरले हाेते.

सचिन शिवाजी कुंभारे (वय २८, रा. जलालखेडा) व विजय सिद्धार्थ सरदार (२७, रा. नारसिंगी) अशी मृतांची नावे आहेत. दाेघेही विठ्ठल-रुख्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला गेले हाेते. रविवारी सकाळी पंढरपूरला पाेहाेचले. दर्शन करण्यापूर्वी त्यांनी चंद्रभागेत अंघाेळ करण्याचा निर्णय घेतला आणि पात्रात उतरले. सचिनला पाण्याचा अंदाज न आल्याने ताे खाेल पाण्यात गेला आणि गटांगळ्या खाऊ लागला. त्यामुळे त्याला वाचविण्यासाठी विजय पुढे सरसावला व ताेही गटांगळ्या खाऊ लागला.

दाेघेही प्रवाहात आल्याने वाहत जात हाेते. त्यातच नागरिकांनी दाेघांनाही नदीतून बाहेर काढले व स्थानिक रुग्णालयात नेले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती दाेघांनाही मृत घाेषित केले. त्या दाेघांनाही पाेहता येत नव्हते. उत्तरीय तपासणीनंतर दाेघांचेही मृतदेह त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले. सचिन हा एकुलता एक मुलगा असून, त्याला एक बहीण, तर विजयला एक भाऊ आहे.

Read in English

Web Title: two youth in Narkhed taluka drowned in Chandrabhaga river in Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.