नरखेड शहरात ‘सेक्सटॉर्शन’चा प्रकार उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:08 AM2021-07-25T04:08:00+5:302021-07-25T04:08:00+5:30
नरखेड : गत काही दिवसापासून नरखेड शहरात सायबर गुन्ह्याचे विविध प्रकार उघडकीस येत आहे. गुरुवारी (दि.२२) रोजी शहरातील प्रतिष्ठित ...
नरखेड : गत काही दिवसापासून नरखेड शहरात सायबर गुन्ह्याचे विविध प्रकार उघडकीस येत आहे. गुरुवारी (दि.२२) रोजी शहरातील प्रतिष्ठित व्यक्तीसोबत ‘सेक्सटॉर्शन’चा प्रकार उघडकीस आला. आपण हा खेळ जिंकला आहात, आपल्या खात्यात या स्कीमची रक्कम वळती करायची आहे. तुम्हाला शासनाकडून एवढी रक्कम मिळाली आहे. मैत्रीसाठी विनंती करून नग्न फोटो मोबाईल धारकांना पाठविले जातात. यानंतर विविध आमिष देत संबंधितांना ओटीपी नंबर मागून त्याच्या बँक खात्यातील पैसे काढून घेतले जातात. असाच काहीसा प्रकार नरखेड शहरातील एका प्रतिष्ठित व्यक्तीसोबत घडला. त्यात त्याचा काहीही गुन्हा नसताना त्याला मानसिक त्रासाला बळी पडावे लागले. गुरुवारी (दि.२२) अखिलेश (बदललेले नाव) यांच्या फेसबुक आयडीवर जिया नाव आसलेल्या मुलीच्या प्रोफाईलवरुन फ्रेंड रिक्वेस्ट आली. ती एक्सेप्ट करताच जिया प्रोफाईलच्या व्यक्तीने अखिलेश यांना व्हीडिओ कॉल केला. यात ती मुलगी नग्न अवस्थेत होती. हा प्रकार बघताच अखिलेश यांनी तो कॉल बंद केला. मात्र त्या मुलीने व्हीडिओ कॉलचा स्क्रीन शॉट काढून अखिलेश यांना ब्लॅकमेल करीत पैशांची मागणी केली. या प्रकाराला सायबरच्या भाषेत ‘सेक्सटॉर्शन’ असे म्हणतात. याबाबत अखिलेश यांनी नरखेड पोलिसांना माहिती दिली. नरखेड पोलीस याप्रकरणी तपास करीत आहे. नागरिकांनी अशा प्रकारापासून सावध रहावे. तसेच समाज माध्यमांचा वापर करताना दक्षता घ्यावी असे आवाहन नरखेडचे पोलीस निरीक्षक जयपालसिंह गिरासे यांनी केले.