नागपुरातून उडणार ‘उड्डाण’चे विमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 11:17 AM2019-03-11T11:17:59+5:302019-03-11T11:20:05+5:30

‘उडे देश का आम नागरिक’ उड्डाण योजनेंतर्गत नागपूरशी संलग्नित रुटसाठी टेंडर काढण्यात आले आहे. आचारसंहितेनंतर याचे वर्क ऑर्डर होणार आहे.

'Uddan' is flying in Nagpur | नागपुरातून उडणार ‘उड्डाण’चे विमान

नागपुरातून उडणार ‘उड्डाण’चे विमान

googlenewsNext
ठळक मुद्देटेंडर निघालेआचारसंहितेनंतर होणार वर्क आॅर्डर

वसीम कुरैशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘उडे देश का आम नागरिक’ उड्डाण योजनेंतर्गत नागपूरशी संलग्नित रुटसाठी टेंडर काढण्यात आले आहे. आचारसंहितेनंतर याचे वर्क ऑर्डर होणार आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी (एमएडीसी)चे उपाध्यक्ष व प्रबंध निदेशक सुरेश काकाणी यांनी सांगितले की क्षेत्रीय संपर्क योजनेंतर्गत देण्यात आलेल्या रुटमध्ये नागपूरचा समावेश आहे. त्यांनी नागपूरशी दोन शहर जुळले असल्याचे सांगितले पण हे दोन शहर नेमके कोणते याची माहिती दिली नाही. नागपूरशी जुळलेल्या रुटसाठी टेंडर काढण्यात आले आहे. आचारसंहिता लागल्यामुळे वर्क ऑर्डरसाठी काही वेळ लागणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर कंपनीला वर्क ऑर्डर देण्यात येईल. याच्या तीन महिन्यानंतर संचालन सुरू करता येईल. सूत्रांच्या मते नागपुरातून भोपाळ व अलाहाबाद रुटचा उड्डाण योजनेत समावेश असू शकतो.

नागपूर विमानतळ तयार आहे
नोव्हेंबर २०१८ मध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत केंद्रीय नागरिक उड्डयन मंत्रालयाच्या संयुक्त सचिव उषा पाधी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे वरिष्ठ विमानतळ निदेशक विजय मुळेकर यांच्याशी क्षेत्रीय संपर्क उड्डाण (आरसीएस)ला घेऊन चर्चा केली होती. तेव्हाच मुळेकर यांनी त्यांना आश्वस्त केले होते की, जर नागपूरला आरसीए फ्लाईटसाठी रुट्स दिल्यास ते संबंधित मार्गासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देऊ शकतात.

Web Title: 'Uddan' is flying in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.