तुमानेंच्या कार्यालयासमोर जल्लोष तर ठाकरे गटाने जाळले नार्वेकर यांचे फोटो
By कमलेश वानखेडे | Published: January 11, 2024 05:30 PM2024-01-11T17:30:34+5:302024-01-11T17:30:43+5:30
रेशीमबाग चौकातील ठाकरे गटाच्या कार्यालया समोर गुरुवारी दुपारी नागपूर शहर प्रमुख किशोर कुमेरिया यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
नागपूर : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा असल्याचा निर्णय दिला. या निर्णयाचे स्वागत करीत शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांच्या कार्यालयासमोर जल्लोष करण्यात आला. तर हा निकाल लोकशाहीची हत्या करणारा असल्याचा आरोप करीत उद्धव ठाकरे गटाकडून रेशिमबाग चौकात नार्वेकर यांचे फोटो जाळत निषेध करण्यात आला.
रेशीमबाग चौकातील ठाकरे गटाच्या कार्यालया समोर गुरुवारी दुपारी नागपूर शहर प्रमुख किशोर कुमेरिया यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. संतप्त शिवसैनिकांनी नारेबाजी करीत नार्वेकर यांचा निषेध नोंदविला. आम्ही सर्व शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत, मिंधे सरकार ला येत्या निवडणुकीत यांची किंमत मोजावी लागेल, असा इशारा यावेळी किशोर कुमेरिया यांनी दिला.
आंदोलनात राजेश कनोजिया, अंकुश कडू, हरिभाऊ बानाईत, किशोर ठाकरे, महेंद्र कठाणे, शंकर बेलखोडे, मनोज शाहू , शारदाताई मेश्राम, मंगला राणे, शेखर खरवडे, संदिप रियाल पटेल, पुषोत्तम बन, किशोर राठोड,रोहित गौर, समित कपाटे,बबलु दरोडे, अंकित खापेकर,उमेश निकम, शाम तेलंग, विकास देशमुख,सतिश डाथरे,शब्बीर शेख, किशोर धोटे, बालु भुते, शुभम लखपती, निखील जाजुलवार, रोहन तळवडकर, राजु रुईकर, नरेन्द मरगडे,गजानन चकोले,अमित निर्मळ, श्रीकांत खंदाडे, प्रदिप तुपकर, मदन टेकाडे, मनोज जाधव, रोशन वानखेडे, राजेश बांडाबुचे, अतुल माने, अक्षय ताजने, सुखदेव डोके यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले.