Uddhav Thackeray: "RSS कार्यालयाचे कोपरे तपासून पाहावे, टाचण्या अन् लिंबू...", उद्धव ठाकरेंचा मोहन भागवतांना सल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 02:46 PM2022-12-29T14:46:06+5:302022-12-29T14:46:59+5:30

शिंदे गटाकडून मुंबई महापालिकेतील पक्ष कार्यालयावर ताबा घेतला गेल्यानं ठाकरे गट आक्रमक झालेला असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यावर भाष्य केलं आहे.

Uddhav Thackeray slams cm eknath shinde over his visit to rss office in nagpur | Uddhav Thackeray: "RSS कार्यालयाचे कोपरे तपासून पाहावे, टाचण्या अन् लिंबू...", उद्धव ठाकरेंचा मोहन भागवतांना सल्ला!

Uddhav Thackeray: "RSS कार्यालयाचे कोपरे तपासून पाहावे, टाचण्या अन् लिंबू...", उद्धव ठाकरेंचा मोहन भागवतांना सल्ला!

googlenewsNext

नागपूर

शिंदे गटाकडून मुंबई महापालिकेतील पक्ष कार्यालयावर ताबा घेतला गेल्यानं ठाकरे गट आक्रमक झालेला असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यावर भाष्य केलं आहे. मिंधे गट काल मुंबई पालिकेतील शिवसेनेच्या कार्यालयावर ताबा मिळवायला गेला, ही वृत्ती अतिशय घाणेरडी आहे. आज ते RSS च्या कार्यालयात गेलेत. मग उद्या ते त्यावरही कब्जा करणार का?, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. ते नागपूरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 

'मी लहान असताना शाखेत आलेलो'; मुख्यमंत्री शिंदेंची RSS च्या स्मृती मंदिराला भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) स्मृतिमंदिराला भेट दिली. याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांनी शिंदेंवर निशाणा साधला. "स्वत:मध्ये काही करण्याची धमक नाही याची कल्पना ज्याला असते तो असं चोऱ्यामाऱ्या आणि दुसऱ्याचं ओरबाडण्याचं काम करतो. पक्ष चोरायचा, नेते चोरायचे हे असलं काम तेच लोक करतात. काल मिंधे गट मुंबई पालिकेत पक्ष कार्यालयावर दावा करायला गेला. आज मुख्यमंत्री RSS च्या कार्यालयात गेलेत मग आता त्या कार्यालयावरही दावा करणार का? आता सरसंघचालक मोहन भागवतांनी कार्यालयाचे कोपरे तपासून पाहावेत कारण जे भेट घ्यायला आले होते ते कुठं लिंबू-मिरच्या-टाचण्या टाकून तर गेले नाहीत ना", असा टोला उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला.    

विदर्भाला काय मिळालं?
राज्याचं हिवाळी अधिवेशन विदर्भात झालं. पण या अधिवेशनात विदर्भाला काय मिळालं? असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी विचारला. विदर्भाला कोणतीही ठोस योजना मिळालेली नाही. उलट ज्यांच्यावर आरोप होत आहेत त्यांना क्लिन चिट द्यायची आणि ज्यांनी आरोप केले त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे ही नवी योजना सरकारनं सुरू केलीय का?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. 

Web Title: Uddhav Thackeray slams cm eknath shinde over his visit to rss office in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.