महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल, म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 03:07 PM2022-12-26T15:07:18+5:302022-12-26T15:16:12+5:30
Winter Session Maharashtra 2022 : आमच्याकडे बरेच बॉम्ब, फक्त पेटवायचा अवकाश - उद्धव ठाकरे
नागपूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंदुत्व मानणारे आहेत. ते नेहमी देवदर्शनाला जात असतात. त्यांना नवस करणं आणि नवस फेडणं यासाठी दिल्लीला जावं लागतं. आजचा दिवस गेलाय म्हणून नवस फेडतोय, उद्याचा दिवस निट जावा यासाठी नवस करतोय.., मात्र यात महाराष्ट्राचं भलं कुठे आलं? सीमावादाच्या मुद्द्यावर ते नवस केव्हा करणार असा रोखठोक सवाल शिवसेना पक्षप्रमुख विधान परिषद सदस्य उद्धव ठाकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.
कानडी लोकांकडून मराठी भाषिक लोकांवर अत्याचार सुरू आहेत. त्याविरोधात सरकार बोलायला तयार नाहीत. अशा सरकारचा आम्ही निषेध करतो. जोपर्यंत सीमावादाचा प्रश्न निकाली लागत नाही, तोपर्यंत हा भाग केंद्रशासित करावा, अशी आमची आग्रही मागणी असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच, आमच्याकडे बरेच बॉम्ब आहेत. वातीही बाहेर काढून ठेवल्या आहेत. आता फक्त पेटवायचा अवकाश आहे, असा इशारा देत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून शिंदे सरकारवर हल्लाबोल केला.
हिवाळी अधिवेशनात मराठवाडा विदर्भाच्या विकासाच्या मुद्द्यावर चर्चा व्हायला हवी होती. मात्र सत्ताधाऱ्यांनीच गोंधळ घातल्यामुळे अधिवेशनाचे तीन दिवस वाया गेले. याचा जाब सत्ताधाऱ्यांनाच विचारावा, अशी मागणी ठाकरे यांनी केली. तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमन्यम स्वामी यांनी राज्यातील सरकार असंवैधानिक आहे, असे म्हटले आहे. याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले स्वामींनी त्यांना घरचा अहेर दिला आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे यांनी दिली.
शेतकरी हैराण सत्तार खातो गायराण; गायराण जमिन प्रकरणात विरोधक आक्रमक
नागपूर मौजे घोडबाभूल जिल्हा वाशिम येथील सरकारी गायराण जमिन १५० कोटीची आहे. गायराण जमिनी कुणाला देता येत नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा निणर्य आहे. ही माहिती सरकारला असतानाही ३७ एकर गायराण जमिन योगेश खंडारे या व्यक्तीला वाटप करण्याचा निणर्य घेतला आहे. या प्रकरणात नागपूर खंडपीठाने आपले गंभीर निरिक्षण नोंदिले आहे. तत्कालीन अब्दूल सत्तार यांच्या प्रकरणी पुरावे आहे. यासंदभर्ात अजित पवार यांनी विधानसभेत आरोप केला. यावेली तत्काळ मंत्रिमंडळातून सत्तार यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी करण्यात आली. या मुद्यावर गोंधळ घालत, विरोधी पक्षांनी विधानसभेच्या पायर्यावर सत्तार आणि सरकारविरोधात घोषणाबाजी केल्या.