उद्धव ठाकरेंचे भाषण म्हणजे निराशेचे अरण्यरुदन; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2022 08:36 PM2022-09-22T20:36:32+5:302022-09-22T20:37:18+5:30

Nagpur News शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांचे कालचे भाषण निराशेचे अरण्यरुदन होते, या शब्दांत त्यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली. नागपुरात गुरुवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Uddhav Thackeray's speech is a cry of despair; Deputy Chief Minister Fadnavis' entourage | उद्धव ठाकरेंचे भाषण म्हणजे निराशेचे अरण्यरुदन; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा टोला

उद्धव ठाकरेंचे भाषण म्हणजे निराशेचे अरण्यरुदन; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा टोला

googlenewsNext
ठळक मुद्देअडीच वर्षांत मला संपविण्याचा प्रयत्न

नागपूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांचे कालचे भाषण निराशेचे अरण्यरुदन होते, या शब्दांत त्यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली. नागपुरात गुरुवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पुढील निवडणूक देवेंद्र फडणवीस यांची शेवटची निवडणूक ठरेल, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला. खरं तर २०१९ ला माझा शेवट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तीनही पक्षांनी मिळून एकत्रितपणे अडीच वर्षे मला संपवण्याचा प्रयत्न केला, पण मला संपवू शकले नाहीत, यापुढेही संपवू शकणार नाहीत, असे फडणवीस म्हणाले.

उद्धव ठाकरे निवडणुका घेण्याची भाषा करत आहेत. ज्या वेळी आमच्या सोबत निवडून येऊन आमच्या पाठीत खंजीर तुम्ही खुपसलाच त्या वेळी राजीनामे का दिले नाही व त्यावेळीच निवडणुका का घेतल्या नाही, असा सवाल फडणवीस यांनी केला. उद्धव ठाकरे हे पंतप्रधान मोदींचे फोटो लावून निवडून आले होते. पण नंतर ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेले. हिंमत होती तर त्या वेळी राजीनामे देऊन निवडून यायचे होते व मग दोन्ही पक्षांसोबत जायचे असते, असेदेखील फडणवीस म्हणाले.

Web Title: Uddhav Thackeray's speech is a cry of despair; Deputy Chief Minister Fadnavis' entourage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.