शुभम महाकाळकर खून प्रकरणात उज्ज्वल निकम सरकारी वकील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 01:21 AM2018-05-05T01:21:13+5:302018-05-05T01:21:24+5:30
शुभम महाकाळकर खून प्रकरणात सरकारच्या वतीने बाजू मांडण्यासाठी प्रसिद्ध फौजदारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी व शुभमच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शुभम महाकाळकर खून प्रकरणात सरकारच्या वतीने बाजू मांडण्यासाठी प्रसिद्ध फौजदारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी व शुभमच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
नोव्हेंबर-२०१६ मध्ये धरमपेठेतील लक्ष्मीभुवन चौकात शुभमचा खून झाला होता. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी व अॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यासाठी आमदार कृष्णा खोपडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले होते. त्यानुसार सरकारने हा निर्णय घेतला. यासंदर्भात विधी व न्याय विभागाने शुक्रवारी आदेश जारी केला.