दिवसा उकाडा, रात्री पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:12 AM2021-09-07T04:12:27+5:302021-09-07T04:12:27+5:30
नागपूर : शहरात सोमवारी दिवसभर उकाड्याने शहरवासीयांना त्रस्त केले. ऊन-सावलीचा खेळ दिवसभर चालला. सायंकाळी उकाडा अधिकच वाढला. मात्र रात्री ...
नागपूर : शहरात सोमवारी दिवसभर उकाड्याने शहरवासीयांना त्रस्त केले. ऊन-सावलीचा खेळ दिवसभर चालला. सायंकाळी उकाडा अधिकच वाढला. मात्र रात्री ९ वाजेनंतर वातावरण बदलले. ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. यामुळे थोडा दिलासा मिळाला.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, उत्तर-पश्चिम आणि पश्चिम-मध्य बंगालच्या खाडीत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, सायक्लोनिक सर्क्युलेशन निर्माण झाले आहे. यामुळेच मध्य भारतातील वातावरणात बदल जाणवत आहे. आंध्र प्रदेश व ओडिशाकडे याचा वेग वाढत आहे. पुढील तीन दिवसात तो पश्चिम-उत्तर दिशेकडे वाढणार आहे. याच दरम्यान, विदर्भात आगामी २४ तासात जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. यामुळे अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नागपुरात सोमवारी दिवसाचे तापमान ३४.८ अंश सेल्सिअस होते. आर्द्रता सकाळी ८७ टक्के, तर सायंकाळी ८० टक्के होती.
...
तीन दिवस पावसाचे
नागपूर शहरात पुढील ८ ते १० सप्टेंबर हे तीन दिवस जोरदार पावसाचे सांगण्यात आले आहेत. हवामान विभागाने हा अंदाज वर्तविला असला तरी, मागील महिनाभरातील अंदाज मात्र चुकीचे ठरल्याचा अनुभव आहे.
...