उमा भारतींनी केले बुक स्टॉलवाल्या तरुणास माफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 12:04 AM2019-04-04T00:04:41+5:302019-04-04T00:05:39+5:30
मंगळवारी बुक स्टॉलवाल्या तरुणाने बंद असलेले एस्केलेटर सुरू केल्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष उमा भारती घाबरल्या होत्या. रेल्वे सुरक्षा दलाने या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, बुधवारी जीटी एक्स्प्रेसने उमा भारती जाण्यासाठी नागपूर रेल्वेस्थानकावर आल्या. यावेळी बुक स्टॉलवाल्या तरुणाने रडत रडत उमा भारतींची माफी मागितली. त्यावर मोठ्या मनाने उमा भारतींनीदेखील या तरुणाला माफ केले. परंतु आरपीएफने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यामुळे आता न्यायालयातच याबाबत निर्णय होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मंगळवारी बुक स्टॉलवाल्या तरुणाने बंद असलेले एस्केलेटर सुरू केल्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष उमा भारती घाबरल्या होत्या. रेल्वे सुरक्षा दलाने या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, बुधवारी जीटी एक्स्प्रेसने उमा भारती जाण्यासाठी नागपूर रेल्वेस्थानकावर आल्या. यावेळी बुक स्टॉलवाल्या तरुणाने रडत रडत उमा भारतींची माफी मागितली. त्यावर मोठ्या मनाने उमा भारतींनीदेखील या तरुणाला माफ केले. परंतु आरपीएफने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यामुळे आता न्यायालयातच याबाबत निर्णय होणार आहे.
केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष उमा भारती नागपूर रेल्वेस्थानकावरील एस्केलेटरवरून जात असताना ते अचानक सुरू झाल्यामुळे त्या थोडक्यात बचावल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली होती. बंद एस्केलेटरवरून जात असताना ते अचानक सुरू झाल्यामुळे उमा भारती घाबरल्या होत्या. त्यांनी स्व:तला सावरले. रेल्वे प्रशासनाच्या या निष्काळजीपणाबद्दल त्यांनी उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालय गाठून याबाबत लेखी तक्रार नोंदविली होती. उमा भारती एस्केलेटरवर चढल्या त्या वेळी एका बुक स्टॉलवाल्या तरुणाला एस्केलेटर बंद असल्याचे लक्षात आले. त्याने त्याच्या जवळील चावीने ते सुरू केले. परंतु तो रेल्वेचा अधिकृत कर्मचारी नसून त्याने एस्केलेटर का सुरू केले, हा प्रश्न उपस्थित करण्यात आला. रेल्वे सुरक्षा दलाने या बुक स्टॉलवाल्या तरुणाविरुद्ध रेल्वे अॅक्ट १५५ नुसार गुन्हा दाखल केला होता. याबाबत आता रेल्वे न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान, बुधवारी उमा भारती जीटी एक्स्प्रेसने परत जाण्यासाठी आल्या असताना बुक स्टॉलवाला तरुण राजा श्रीवास याने त्यांची भेट घेतली. काल एस्केलेटर आपणच सुरू केल्याचे त्याने सांगितले. एस्केलेटर बंद होते. परंतु आपण जात असल्यामुळे आपणास त्रास होऊ नये म्हणून मी ते सुरू केले, अशी माहिती या तरुणाने उमा भारतींना देऊन माफी मागितली. त्यावर उमा भारतींनीही त्याला माफ केल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.