बोरीच्या विनोदची यूपीएससीत भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2016 02:38 AM2016-05-11T02:38:33+5:302016-05-11T02:38:33+5:30
ेजिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण, सर्वसामान्य शाळेत दहावीपर्यंतचे तर पदवी शिक्षणासाठी कन्हानला रोज सायकलने १०
गणेश खवसे ल्ल नागपूर
ेजिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण, सर्वसामान्य शाळेत दहावीपर्यंतचे तर पदवी शिक्षणासाठी कन्हानला रोज सायकलने १० किमीचा प्रवास आणि एक जिद्द मनात ठेवून मार्गक्रमण करणाऱ्या विनोदकुमार चंद्रभान येरणे यांनी छोट्याशा गावाचे नाव उंचावले. त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेत ७०९ वा रँक मिळवित सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
मौदा तालुक्यातील बोरी (सिंगोरी) या छोट्याशा गावात परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या येरणे कुटुंबात ८ आॅगस्ट १९८२ रोजी जन्मलेल्या विनोदकुमार यांची संघर्षकथा तशी थरारकच म्हणावी लागेल. घरी केवळ चार एकर शेती. त्यातच गेल्या १२ वर्षांपूर्वी विनोदकुमार यांच्या वडिलांचे निधन झाले आणि कुटुंबावर दु:खाचा पहाड कोसळला. परंतु त्यातून आई शकुंतलाबाई आणि मोठा भाऊ प्रदीप यांनी कुटुंबाला सावरले. त्यामुळेच पुढील शिक्षणात कुठेही व्यत्यय आला नाही. बोरी गावातीलच जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण, त्यानंतर तारसा येथील हायस्कूलमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. पुढे ११-१२ वी सालवा येथील कनिष्ठ महाविद्यालयातून झाले. त्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी त्यांचा खरा संघर्ष सुरू झाला. पदवी शिक्षण घ्यायचे असल्यास तालुक्याचे ठिकाण मौदा किंवा कन्हान असा पर्याय त्यांच्याकडे होता. मौदा ये-जा करणे परवडण्यासारखे नसल्याने त्यांनी कन्हान निवडले.
पार्टटाईम व्हिडिओ शुटिंगही केले
४संघर्षाचे दिवस पाहिलेल्या विनोदकुमार यांच्या यशामुळे अख्खे बोरी (सिंगोरी) गाव आनंदी झाले आहे. ‘मेहनत रंग लायी’ असे त्यांचा लहान भाऊ नरेश यांचे म्हणणे आहे. कोणताही खंड पडू न देता त्यांनी शिक्षण सुरू ठेवले. दरम्यान त्यांनी आपल्या भावाला आर्थिक हातभार लावावा म्हणून भाऊ करीत असलेल्या ‘व्हिडिओ शुटिंग’साठी कॅमेरासुद्धा हातात घेतला. मग कुठे लग्न असो वा कुठे वाढदिवस... तेथे जाऊन शुटिंग करण्यासही विनोदकुमार यांनी मागेपुढे बघितले नाही.