उमरेड-कऱ्हांडल्यात ‘मास्टर ब्लास्टर’

By admin | Published: February 21, 2016 02:30 AM2016-02-21T02:30:06+5:302016-02-21T02:30:06+5:30

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शनिवारी पहाटेच्या सुमारास उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात भ्रमंती केली.

Umred-Fundamentalist 'Master Blaster' | उमरेड-कऱ्हांडल्यात ‘मास्टर ब्लास्टर’

उमरेड-कऱ्हांडल्यात ‘मास्टर ब्लास्टर’

Next

सचिन तेंडुलकरने कुटुंबीयांसह केली जंगलसफारी
उमरेड : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शनिवारी पहाटेच्या सुमारास उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात भ्रमंती केली. अत्यंत गोपनीय ठेवलेल्या या दौऱ्यात सचिनने पत्नी अंजली, मुलगा अर्जुन यांच्यासह अभयारण्यात भ्रमंतीचा एकदा नव्हे तर दोनदा आनंद लुटला. जंगल भ्रमंतीसाठी पहाटेपासूनच आलेल्या पर्यटकांनाही सचिन येणार असल्याची माहिती नव्हती. तर वन विभागानेही सचिनचा दौरा अतिशय गुप्त ठेवला. पत्रकारांनाही दूरच ठेवण्यात आले होते.
सचिन त्याच्या कुटुंबीयांसह शुक्रवारी रात्री नागपुरात दाखल झाला. त्यानंतर लगेच उमरेडनजीकच्या एका हॉटेलात त्यांचा रात्री मुक्काम होता. पहाटेच्या सुमारास तेंडुलकर कुटुंबीयांनी वनविभागाच्या विश्रामगृहालगत असणाऱ्या प्रवेशद्वारातून अभयारण्यात ‘एन्ट्री’ केली. दरम्यान, जंगलभ्रमंतीसाठी आलेल्या पर्यटकांना जंगलात सचिन दिसताच अनेकांनी वाघाला सोडून सचिनलाच अधिक पसंती दिली.

 

Web Title: Umred-Fundamentalist 'Master Blaster'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.